आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला एकमेव सामना खेळल्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ९ वर्षापूर्वीच्या वर्णद्वेषी ट्विटप्रकरणी कारवाई करत चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे. या कारवाईनंतर आता रॉबिन्सनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून काहीकाळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा काउंटी संघ ससेक्सकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
रॉबिन्सनने घेतला क्रिकेटमधून ब्रेक
ओली रॉबिन्सनने क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेत असल्याचा निर्णय ससेक्स संघ व्यवस्थापनाने अधिकृतरित्या जाहीर केला. त्यांच्या निवेदनानुसार, ‘ओली रॉबिन्सनने क्रिकेटमधून काही कालावधीसाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो हा वेळ आपल्या कुटुंबीयासोबत घालवू इच्छितो. उर्वरित काउंटी चॅम्पियनशिप व टी२० ब्लास्ट मधील काही सामने खेळणार नाही. आम्ही त्याच्या नेहमी संपर्कात राहू.’
रॉबिन्सनने लॉर्ड्स येथील आपल्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून ७ बळी मिळवले होते. तसेच, पहिल्या डावात फलंदाजी करताना ४२ धावा देखील फटकावलेल्या.
पंतप्रधानांनी देखील केले भाष्य
इंग्लंडमध्ये रॉबिन्सनला निलंबित करण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांनीही ईसीबीच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. मात्र, ईसीबी आपल्या निर्णयावर ठाम आहे. तसे, रॉबिन्सननंतर आता इंग्लंडच्या अन्य बड्या खेळाडूंचे जुने वादग्रस्त ट्विटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर ईसीबीने त्यांच्याविरूद्धही चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. या खेळाडूंमध्ये कर्णधार ओएन मॉर्गन, अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि यष्टीरक्षक जोस बटलर यांचा समावेश आहे.
सध्या २७ वर्षाचा असलेला ओली रॉबिन्सनने २०१३ मध्ये यॉर्कशायरसाठी प्रथमश्रेणी पदार्पण केल्यानंतर पुढील वर्षी हॅम्पशायरचेही प्रतिनिधित्व केले. २०१५ पासून तो ससेक्स संघाचा भाग आहे. त्याने आत्तापर्यंत ६४ प्रथमश्रेणी सामने खेळताना २८६ बळी मिळवले आहे. सोबतच त्याच्या नावे १ शतक व ७ अर्धशतके देखील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“तर मी एमएस धोनीला पाकिस्तानचा कर्णधार बनवले असते”
एमएस धोनीजवळ इतक्या बाईक्स आहेत, त्याला स्वत:लाही आकडा सांगता येत नाही, भारतीय क्रिकेटरचा खुलासा
टीम इंडिया सावधान, न्यूझीलंडची ‘ही’ गोष्ट ठरु शकते घातक, माजी भारतीय दिग्गजाचा इशारा