14 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे. पण या सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान ऑली स्टोन दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
वॉरविक्शायर या क्लबकडून खेळणाऱ्या स्टोनला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे. याबद्दल वॉरविक्शायरचे क्रीडा संचालक पॉल फारब्रास यांनी माहिती दिली आहे.
ते म्हणाले, ‘ऑली स्टोनसाठी निराशाजनक आहे की त्याला महत्त्वाच्या दोन आठवड्यांसाठी क्रिकेटपासून लांब रहावे लागणार आहे. त्याला पून्हा एकदा पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे.’
25 वर्षीय स्टोनने मागील महिन्यात लॉर्ड्सवर आयर्लंड विरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या ऍशेस सामन्यासाठी त्याची 14 जणांच्या इंग्लंड संघात निवड झाली होती. पण त्याला 11 जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती आणि आता त्याला पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या ऍशेस सामन्यातूनही बाहेर पडावे लागले आहे.
स्टोनबरोबरच इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन उजव्या पायाच्या पोटरीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
इंग्लंडने दुसऱ्या ऍशेस सामन्यासाठी अजून त्यांचा संघ जाहिर केलेला नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहितने अतिशय कष्टाने केलेला तो विक्रम आज धोक्यात
–‘चायनामन’ कुलदीप यादवला शमी, बुमराहचा हा खास विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी
–या कारणामुळे ख्रिस गेल आजचा सामना कधीही विसरणार नाही…