ऑलिम्पियन तलवारबाज भवानी देवी हिने सोमवारी (19 जून) चीनच्या वूशी येथील आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिला सेबर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत इतिहास रचला. भारताला या स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. भवानीने उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान विश्वविजेत्या जपानच्या मिसाकी इमुरा हिला 15-10 असे पराभूत केले.
https://twitter.com/Media_SAI/status/1670756202546880512?t=BVmcq8nykmqpMFNsajv9Dg&s=19
29 वर्षीय भवानीला उपांत्यपूर्व फेरीचा सामन्यात कझाकस्तानच्या डोसपे करिनाला पराभूत करण्यापूर्वी राऊंड ऑफ 64 च्या फेरीत बाय मिळाला होता. त्यानंतर भवानीने प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिसऱ्या मानांकित ओझाकी सेरीचा 15-11 असा पराभव केला.
फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी भवानीचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
“भारतीय तलवारबाजीसाठी हा खूप अभिमानाचा दिवस आहे. याआधी कोणीही जे करू शकले नाही ते भवानीने करून दाखवले आहे. प्रतिष्ठित आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय तलवारबाज आहे. संपूर्ण तलवारबाजी जगताच्या वतीने मी तिचे अभिनंदन करतो. तीने सुवर्णपदक घेऊन देशात यावे अशी इच्छा आहे.”
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय तलवारबाज भवानी देवी टोकियो ऑलिम्पिकमध्ये राऊंड ऑफ 32 मधून बाहेर पडली होती.
(Olympian Indian Fencer Bhavani Devi Entered In Asian Fencing Championship)