---Advertisement---

स्टार हॉकीपटूंच्या मैत्रीपूर्ण सामन्याने भरले अनोखे रंग

---Advertisement---

पुणे, 25 जुलै, 2024: हॉकी महाराष्ट्रने ‘लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट’ या थीमखाली साजरा केलेल्या ऑलिम्पिक दिन कार्यक्रमात स्टार हॉकीपटूंच्यामैत्रीपूर्ण सामन्याने भरले अनोखे रंग भरले. या सामन्यात ऑलिम्पियन इलेव्हनने महाराष्ट्र इलेव्हनवर 6-2 असा विजय मिळवला.

आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा दिनाचे औचित्य साधून जगभरात 23 जून रोजी ऑलिम्पिक दिन साजरा होतो. याचाच एक भाग म्हणून हॉकी इंडियाच्या देशव्यापी कार्यक्रमात सक्रिय सहभाग म्हणून हॉकी महाराष्ट्राने त्यांचे प्रमुख मैदान असलेल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या ऑलिम्पियन इलेव्हन आणि महाराष्ट्र इलेव्हन यांच्यात ‘ऑलिम्पिक डे हॉकी फ्रेंडली’ सामना खेळवण्यात आला.

ऑलिम्पियन इलेव्हनच्या बाजूने लागलेल्या 6-2 या अंतिम निकालाने त्यांचा सर्वोत्तम खेळ आणि प्रतिभा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. विक्रम पिल्ले आणि प्रियांका वानखेडे यांनी केलेले प्रत्येकी दोन तसेच रमेश पिल्ले आणि देवेंद्र वाल्मिकी यांनी केलेला प्रत्येकी एक गोल हे त्यांच्या मोठ्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

प्रतिस्पर्धी महाराष्ट्र इलेव्हनमध्ये वरिष्ठ राज्य पुरुष आणि महिला संघातील खेळाडूंचा समावेश होता. त्यांच्याकडून अनिकेत गुरव आणि दुर्गा शिंदे यांनाच गोल करता आला. माजी सहकार्‍यांसोबत पुन्हा खेळण्याचा अनुभव अवर्णनीय होता, असे सर्वच सहभागी खेळाडूंनी सांगितले.

54 वर्षीय अजित लाक्रा (1992 बार्सिलोना) हे स्टार कास्टमधील सर्वात अनुभवी खेळाडू होते. राहुल सिंग (1996 अटलांटा), आणि खडकीतील विक्रम पिल्ले (2004 अथेन्स) आणि देविंदर वाल्मिकी (2016 रिओ ऑलिम्पिक) या खेळाडूंची मैदानावरील उपस्थिती लक्षणीय ठरली.

त्यानंतर, सर्व ऑलिम्पियन्सनी निमंत्रित, हितचिंतक, मुले, इतर खेळाडू आणि समिती सदस्यांच्या उपस्थितीत केक कापून आनंद ऑलिम्पिक दिन साजरा केला.

यावेळी, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाणार्‍या भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा देण्यासाठी, हॉकी महाराष्ट्रने सर्वांसाठी त्यांच्या वैयक्तिक शुभेच्छा देण्यासाठी आणि लिहिण्यासाठी हॉकी महाराष्ट्रतर्फे एक विशेष ऑटोग्राफ बोर्ड तयार करण्यात आला. त्यावर सर्वच खेळाडू आणि उपस्थितांनी स्वाक्षर्‍या केल्या.

संपूर्ण कार्यक्रमावेळी मनोज भोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे, उपाध्यक्षा मनीषा आकरे, सदस्या हेलन मेरी, माजी कोषाध्यक्ष जसिंता जाधव आदी उपस्थित होते.

निकाल – ऑलिम्पियन इलेव्हन: 6(विक्रम पिल्ले 2, प्रियांका वानखेडे 2, रमेश पिल्ले 1, देवेंद्र वाल्मिकी 1) विजयी वि. महाराष्ट्र इलेव्हन: 2(अनिकेत गुरव, दुर्गा शिंदे). हाफटाईम: 2-0

संघ
ऑलिम्पियन इलेव्हन: अजित लाक्रा, राहुल सिंग, विक्रम पिल्ले, देवेंद्र वाल्मिकी, रमेश पिल्ले, धनंजय महाडिक, विकास पिल्ले, नियाज रहीम, अमित गौडा, प्रियांका वानखेडे, सागर ठाकूर, लक्ष्मण राव, शिवरतन रसाळ (गोलकीपर).

महाराष्ट्र इलेव्हन : मयूर धनावडे, दर्शन गावकर, व्यंकटेश केंचे, तालिब शहा, अनिकेत गुरव, दुर्गा शिंदे, दीक्षा अवघडे, आफरीन शेख, अक्षय आवाड, आदित्य रसाळ, नूपूर (गोलकीपर).

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---