दक्षिण आफ्रिका येथे खेळला गेलेला पहिला महिला अंडर 19 टी20 विश्वचषक भारतीय संघाने आपल्या नावे केला. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत विश्वचषक उंचावला. शफाली वर्माच्या नेतृत्वातील या युवा संघाचे सर्वत्र कौतुक होतेय. मात्र, भारतीय संघाचे हे यश ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्रा याने थेट मैदानावर जाऊन साजरे केले.
https://www.instagram.com/reel/CoB4JsEJkPq/?igshid=YmMyMTA2M2Y=
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा याने प्रेक्षकांमध्ये बसून पाहिला. सामन्याच्या पूर्वसंध्येला त्याने भारतीय खेळाडूंची भेट घेत, त्यांचे मनोबल देखील वाढवलेले. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर, काही मिनिटातच नीरज प्रेक्षकांमधून उठून खेळाडूंसोबत जल्लोष करण्यासाठी मैदानावर पोहोचला.
.@Neeraj_chopra1 is in the house for the Finals of the #U19T20WorldCup ???????? pic.twitter.com/nsbmYgIvZr
— BCCI Women (@BCCIWomen) January 29, 2023
आयसीसीच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यामध्ये नीरज टाळ्या वाजवत मैदानात येताना दिसतोय. तसेच, त्याने थेट मान झूकवून सर्व खेळाडूंना अभिवादन केले. त्यानंतर त्याने सर्व खेळाडूंची गळाभेट देखील घेतली. नीरज सध्या सरावासाठी दक्षिण आफ्रिकेत आहे.
पोचेस्ट्राम येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. टिटस साधू, पार्श्वी चोप्रा व अर्चना देवी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत इंग्लंडला केवळ 68 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर शफाली वर्मा, सौम्या तिवारी व गोंगडी त्रिशा यांनी शानदार फलंदाजी करत संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला. वरिष्ठ अथवा कनिष्ठ स्तरावरील भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.
(Olympic gold medalist Neeraj Chopra bows down to India U19 Women players as mark of respect post T20 World Cup glory)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला क्रिकेटपटू पार्श्वीने पहिल्या प्रेमासाठी केला त्याग; क्रिकेटर नव्हे तर…
सेव्हन अ साईड फुटबॉल | कॉन्स्टलेशन चिताज संघाला दोन गटात विजेतेपद; मार्व्हल्स, स्ट्रायकर्स, पॅंथर्स अन्य गटात विजेते






