टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये बॉक्सिंग खेळात भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या लवलिना बोर्गोहेनने नुकतेच सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करत भारतीय क्रीडा क्षेत्रात भूकंप आणला आहे. आपल्यावर अन्याय होत असल्याचे तिने यामध्ये म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
मागील वर्षी जपानच राजधानी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग खेळात महिलांच्या लाईटवेट गटात कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली होती. मेरी कोमनंतर बॉक्सिंगमध्ये ऑलिंपिक पदक जिंकणारी ती केवळ दुसरी भारतीय महिला बॉक्सर ठरलेली. सध्या ती इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी गेली आहे. तेथून तिने सोशल मीडियावर एक पत्र लिहिले. यामध्ये आपल्यावर कशाप्रकारे अन्याय होत आहे हे तिने सांगितले. तिने पत्र लिहीत म्हटले,
https://twitter.com/lovlinaborgohai/status/1551520397832720385?s=24&t=mFzI1WcYHHHhz7gGWuy4EQ
“आज मोठ्या दुःखाने मला हे लिहावे लागत आहे की, माझ्यावर खूप अन्याय होत आहे. मला आणि मला ऑलिम्पिक पदक जिंकण्यात मदत करणाऱ्या प्रशिक्षकांना रोखले जात आहे. माझ्या प्रशिक्षणात व स्पर्धांमध्ये नेहमी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्या प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या संध्या गुरूंगजी या द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या आहेत. हजार वेळा सांगितल्यानंतर माझ्या प्रशिक्षकांना कॅम्पमध्ये घेतले जाते. मला प्रशिक्षणा दरम्यान खूप त्रास होतो. याचा परिणाम माझ्या मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. माझ्या प्रशिक्षक संध्या अजूनही कॉमनवेल्थ व्हिलेजच्या बाहेर आहेत. माझी स्पर्धा आठ दिवसांवर आली असतानाही माझे प्रशिक्षण रोखले गेले आहे. माझ्या दुसऱ्या प्रशिक्षकांनाही भारतात पाठवले गेलेय. या सर्व प्रकरणामुळे मला खूप त्रास होतोय. मला समजत नाही की मी खेळावर कसे लक्ष केंद्रित करू. त्यामुळे माझी मागील आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील खराब गेली. या राजकारणामुळे मला माझे कॉमनवेल्थ पदक गमवायचे नाही. मला आशा आहे की या सर्व प्रकरणातून बाहेर येत मी देशासाठी पदक जिंकेल. जय हिंद.”
लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना या प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
यादव-रविची फिरकी आता वेस्ट इंडिजला दाखवणार तारे
भारताच्या दर्शकांसाठी मेजवाणी! आयपीएलनंतर ‘या’ मोठ्या स्पर्धांचे सामने दिसणार डिज्नी-स्टारवर






