ऑलिम्पिक २०१२च्या स्पर्धेत सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने कांस्यपदक जिंकले. तिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा पहिली भारतीय बॅडमिंटनपटू होण्याचा मान मिळवला. त्याचवर्षी एका भारतीय बॅडमिंटनपटूने लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन ली जुरेई हिचा पराभव करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिचं नाव आहे पुसर्ला वेंकट सिंधू अर्थातच पीव्ही सिंधू (PV Sindhu). ती आज तिचा २७वा (५ जुलै, १९९५) वाढदिवस साजरा करत आहे.
हैद्राबाद, आंध्र प्रदेश येथे जन्मलेल्या सिंधूने ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तिने बीडब्लूएफच्या (बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन) अंतर्गत स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. तिने २०१९मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. पुलेला गोपीचंद यांनी २००१मध्ये ऑल इंडिया इंग्लंड चॅम्पियनशीपचा किताब जिंकल्यानंतर सिंधूने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू होण्याचा निर्धार केला. वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी तिने हातात रॅकेट घेतली आणि या खेळाप्रती तिने स्वत:ला झोकून दिलं.
सिंधूने सर्वप्रथम मेहबूब अलीच्या प्रशिक्षणाखाली खेळाचे मौल्यवान ज्ञानप्राप्त केले आणि सिकंदराबाद येथील भारतीय रेल्वे संस्थेत प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर लगेचच गोपीचंद बॅडमिंटन अॅकॅडमीमध्ये दाखल झाली. गोपीचंद हे अनेक खेळाडू घडवत आहेत. याच अकॅडमीमध्ये नेहवालनेही बॅडमिंटनचे धडे गिरवले आहेत. सिंधूने २०१७च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले.
गोल्डकोस्ट येथे झालेल्या २०१८ कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धेत सिंधूने रौप्यपदक जिंकले. वर्ल्ड चॅम्पियनशिपचे पाच पदके जिंकणारी सिंधू ही चीनच्या झॅंग निंग नंतर ती दुसरीच महिला बॅडमिंटनपटू आहे. तर २०१६ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. तिने या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. २०२०टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने कांस्यपदक पटकावत इतिहास निर्माण केला. सलग दोन वैयक्तिक ऑलिम्पिकपदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आणि जगातील चौथी बॅडमिंटनपटू ठरली आहे.
पद्मश्री आणि पद्मभूषणपुरस्कृत सिंधूला आतापर्यंत राजीव गांधी खेलरत्न (२०१६) आणिअर्जुन पुरस्कारने (२०१३) सन्मानित करण्यात आलेले आहे. तिने ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिपबरोबरच कॉमनवेल्थचे तीन पदक पटकावत दिवसेंदिवस तिचा खेळ उंचावण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामध्ये ती उत्तमरीत्या यशस्वीदेखील झाली आहे.
2️⃣ Olympic medals, 2️⃣ Commonwealth Games medals, 5️⃣ BWF World Championship medals including a 🥇 & the list goes on! 🔥
Sending birthday wishes to one of the most decorated Indian shuttler, superstar @Pvsindhu1 🥳🎂#IndiaontheRise#HappyBirthdayPVSindhu#PVSindhu #Badminton pic.twitter.com/c17nxcGjkv
— BAI Media (@BAI_Media) July 5, 2022
सध्या जागतिक क्रमवारीत महिला एकेरीमध्ये ७व्या स्थानावर असलेल्या सिंधूचे पहिल्या क्रमांकावर पोहचण्याचे ध्येय आहे. या आधी ती २०१७मध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर होती. प्रकाश पदुकोण १९८०मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होते. नेहवाल आणि सिंधू यांनी जगतिक स्पर्धेत आणि ऑलिम्पिकमध्ये त्यांचा खेळ उंचावत, पदके जिंकत बॅडमिंटनला क्रिकेटप्रिय भारत देशात एक वेगळे स्थान मिळवून दिले आहे.
वर्षानुवर्षे इंडोनेशिया,चिनी, दक्षिण कोरिया या देशांतील खेळाडूंचा दबदबा असलेल्या बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सायना नेहवाल, श्रीकांत किदम्बी, पी. कश्यप, पी. व्ही. सिंधू, लक्ष्यसेन इतर अनेक बॅडमिंटनपटूंनी जागतिक स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबीचे अध्यक्ष झाल्यानंतर रमीझ राजांच्या जीवाला धोका? स्वत: उलघडली परिस्थिती
कसोटी सामना एकीकडे अन् चाहत्यांची भांडणं दुसरीकडे, दोन देशांच्या फॅन्समधील वर्णद्वेष उघड
VIDEO। कोरोनातून बरा होताच रोहितने नेट्समध्ये गाळला घाम, आर अश्विनसोबत केला विशेष सराव