पुणे। ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वनप्लेस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात सृष्टी सूर्यवंशी हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने काल अव्वल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या ईश्वरी कारेकरचा 6-4, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या मानांकित रितिका डावलकरने सातव्या मानांकित ऐश्वर्या स्वामिनाथनचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून आपले आव्हान कायम राखले. दुहेरीत याच गटात सृष्टी सूर्यवंशी व रितिका डावलकर या अव्वल मानांकित जोडीने काव्या तुपे व ऐश्वर्या स्वामिनाथन यांचा 6-0, 6-4 असा तर, रित्सा कोंडकर व काव्या पांडे यांनी शिबानी गुप्ते व मायरा टोपणो यांचा 6-7(5), 6-4, 10-6 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
मुलांच्या गटात अव्वल मानांकित स्मित उंद्रेने सय्यम पाटीलचे आव्हान 6-2, 6-2 असे मोडीत काढले. सर्वज्ञ सरोदेने चौथ्या मानंकित वीरेन चौधरीवर 6-1, 6-4 असा विजय मिळवला. तनिष्क देवरेने अंशुल पुजारीचा 6-2, 6-4 असा तर, सहाव्या मानांकित आर्यन कीर्तनेने दुसऱ्या मानांकित वरद उंद्रेचा 6-4, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी): मुले:
सर्वज्ञ सरोदे वि.वि.स्मित उंद्रे[1]4-6, 6-2, 6-2;
आर्यन कीर्तने[6] वि.वि.तनिष्क देवरे 7-6(5), 6-4;
मुली:
सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.ईश्वरी कारेकर 6-4, 6-1;
रितिका डावलकर[2]वि.वि.ऐश्वर्या स्वामिनाथन[7]6-2, 6-2;
दुहेरी: मुले:उपांत्य फेरी:
स्मित उंद्रे/वरद उंद्रे[1]वि.वि.आर्यन कीर्तने/नमिश हूड[3] 6-3, 2-6, 10-7;
वीरेन चौधरी/अथर्व डकरे[2] वि.वि. अंशुल पुजारी/सर्वज्ञ सरोदे 6-4, 5-7, 13-11;
मुली:
सृष्टी सूर्यवंशी/रितिका डावलकर[1]वि.वि.काव्या तुपे/ऐश्वर्या स्वामिनाथन[4] 6-0, 6-4;
रित्सा कोंडकर/काव्या पांडे[2]वि.वि.शिबानी गुप्ते/मायरा टोपणो 6-7(5), 6-4, 10-6.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष! बॉलिवूडच्या ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख खान
एकेकाळचा भारतीय संघाचा ‘पोस्टर बाॅय’ ते सतत चर्चेत राहणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक