---Advertisement---

ओमानच्या कर्णधाराची गर्जना! ऑस्ट्रेलियाला दिलं खुलं आव्हान; विश्वचषकात येणार आमनेसामने

On: बुधवार, जून 5, 2024 12:35 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 ची सुरुवात रोमांचक झाली आहे. स्पर्धेत आतापर्यंत अनेक छोट्या संघांनी चांगली कामगिरी केली, ज्यामध्ये ओमानचाही समावेश आहे. जरी ओमानला आपल्या पहिल्या सामन्यात नामिबिया विरुद्ध पराभव पत्कारावा लागला, तरी हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला होता. आता ओमानच्या कर्णधारानं चक्क ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला आव्हान दिलं आहे.

टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ ओमानविरुद्ध आपल्या अभियानाला सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार 6 जून रोजी सकाळी 6 वाजता खेळला जाईल. या सामन्यापूर्वी ओमानचा कर्णधार आकिब इलियास यानं ऑस्ट्रेलियाला खुलं आव्हान दिलं आहे.

आकिब इलियास म्हणाला, “ऑस्ट्रेलियाच्या संघात पूर्वी स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनसारखे खेळाडू होते, जे तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट होते. मात्र आता त्यांच्याकडे असे जास्त खेळाडू नाहीत. त्यांचे खेळाडू आता मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात. ते फक्त षटकार मारण्यासाठी जातात.”

ओमानचा कर्णधार खेळपट्टीबाबत बोलताना म्हणाला की, “प्रत्येक दिवस सारखा नसतो. जर नामिबिया विरुद्धच्या सामन्यासारखी खेळपट्टी असेल, तर ते (ऑस्ट्रेलिया) संघर्ष करू शकतात. तुम्ही पाहिलं असेल की, पापुआ न्यू गिनी विरुद्ध वेस्ट इंडिजला किती अडचणींचा सामना करावा लागला. संघात अनेक बिग हिटर्स असूनही त्यांची 130 धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली होती”.

ओमाननं टी20 विश्वचषक 2024 ची सुरुवात नामिबिया विरुद्धच्या सामन्यानं केली होती. या सामन्यात ओमाननं नामिबियाला कडवी लढत दिली होती, ज्यानंतर सामना टाय झाला. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये नामिबियानं विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ओमाननं 19.4 षटकांत सर्वबाद 109 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, नामिबियाचा संघही 20 षटकांत 6 गडी गमावून 109 धावाच करू शकला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

पावसामुळे वाहून जाईल भारत विरुद्ध आयर्लंड सामना? आज न्यूयॉर्कमधील हवामान कसं असेल? सर्वकाही जाणून घ्या
टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा शानदार विजय, इंग्लंडचं मोठं नुकसान
शिवम दुबे ठरणार गेमचेंजर? प्लेइंग इलेव्हनमध्ये आणण्यासाठी टीम इंडिया घेऊ शकते मोठा निर्णय!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---