---Advertisement---

इंग्लंडच्या मैदानावर एडन मार्करमचा कहर! सर्वात वेगवान अर्धशतक ठोकत तोडले अनेक रेकॉर्ड्स!

On: मंगळवार, सप्टेंबर 2, 2025 10:15 PM
Aiden Markram
---Advertisement---

इंग्लंडच्या मैदानावर एडम मार्करमने (Aden Markram) पहिल्याच वनडे सामन्यात फलंदाजीच्या जोरावर धुमाकूळ उडवला. हेडिंग्ले मैदानावर मार्करमने इंग्लंडच्या गोलंदाजीला चोख उत्तर दिले. प्रोटियाजच्या ह्या फलंदाजाने फक्त 55 चेंडूंचा सामना करून 86 धावा करून जोरदार खेळी दाखवली.

मार्करमने आपले अर्धशतक फक्त 23 चेंडूत पूर्ण केले आणि इतिहास रचला. तो दक्षिण आफ्रिकेचा ओपनर म्हणून वनडेमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे. मार्करमच्या धांसू खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडला 7 विकेटने पराभूत केले.

इंग्लंडने दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकाने मार्करम आणि रयान रिकेल्टन (Ryan Ricklton) यांच्या जोरदार सुरुवातीने सामना सुरळीत केला. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी फक्त 18.1 षटकात 121 धावा जोडल्या. मार्करमने इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाला चांगलाच त्रास दिला आणि मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात जोरदार शॉट्स खेळले.

मार्करमने आपले अर्धशतक फक्त 23 चेंडूत पूर्ण केले. त्यांच्या झपाट्याच्या खेळीमुळे साउथ आफ्रिकाने 50 धावांचे टप्पे फक्त 5.2 षटकात पार केले. 86 धावांच्या विस्फोटक खेळात मार्करमने 13 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 156 च्या स्ट्राइक रेटने खेळत मार्करमने 86 धावा केल्या.

एडम मार्करमने दक्षिण आफ्रिका संघाचा ओपनर म्हणून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकल्याचा विक्रम आपल्याच नावावर नोंदवला. त्याने इंग्लंड-दक्षिण आफ्रिका मालिकेत वनडेमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज बनण्याचा मान मिळवला. मार्करमने क्रिस मॉरिसचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला होता.

मोऱिसने 2016 मध्ये फक्त 30 चेंडूत अर्धशतक केले होते. मार्करमसोबत रिकेल्टन 31 धावांनी नाबाद राहिला. यापूर्वी इंग्लंडची संपूर्ण टीम फक्त 131 धावांवर ऑलआउट झाली होती. गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकाकडून वियान मुल्डरने 3 आणि केशव महाराजने 4 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---