भारत आणि विंडिज यांच्यातला दुसरा कसोटी सामना हैद्रबाद येथे चालू आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत सेल्फी काढण्यासाठी खेळपट्टीवर जाणाऱ्या चाहत्याला हा सेल्फी चांगलाच महागात पडला आहे.
सामना सुरू झाल्यानंतर तासाभराने 19 वर्षीय मोहम्मद खानने बॅरिकेटर्सवरून उडी मारून क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीच्या दिशेने धाव घेतली होती.
त्याने विराटला मिठी मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला मैदानातुन बाहेर नेले होते.
आंध्रप्रदेशातील काडपा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मोहम्मद खानला विराट सोबतचा सेल्फी काढल्याची चांगलीच किंमत चुकवावी लागणार आहे.
“सुरक्षेचे नियम तो़डून खेळपट्टीवर प्रवेश केल्या प्रकरणी माेहम्मद खान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.” असे पोलिस इंस्पेक्टर पी व्यंकटेस्वरलु यांनी सांगितले आहे.
विराटच्या चाहत्याने खेळपट्टीवर येण्याची ही या मालिकेतील दुसरी वेळ आहे. राजकोट येथे विंडिजविरूद्ध झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन चाहत्यांनी खेळपट्टीवर जाऊन सेल्फी घेतला होता.
https://twitter.com/prashan23S/status/1050694452208160768
महत्वाच्या बातम्या-
- आज होणार भारत विरुद्ध चीन ऐतिहासिक फुटबॉल सामना
- सातत्याने अपयशी ठरणाऱ्या केएल राहुलवर चाहत्यांची सोशल मिडियातून टीका
- अशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय