---Advertisement---

२१ वर्षांपुर्वी थेट हेडफोनद्वारे विश्वचषकातील चालू सामन्यात तो प्रशिक्षाकांनी साधत होता संवाद

---Advertisement---

क्रिकेट जसे दिवसेंदिवस पुढे जात आहे, तसं तसे या खेळात अनेक नियम येत आहे. शेवटी खेळात शिस्त आणण्यासाठी त्या त्या वेळी आलेल्या समस्येवर उपाय म्हणून नियम केले जातात. हे नियम खेळाडूंवर बंधनकारक असतात. जे हे नियम पाळत नाही, त्याला आयसीसीच्या शिस्तभंग समितीसमोर जावे लागते, व कधी कधी तर बंदीलाही सामोरे जावे लागते.

परंतू एखादी घटना अशीही असते, जेव्हा खेळाडूंचे वर्तन हे योग्य नसते परंतू या वर्तनाला पायबंद घालायला आयसीसीने कोणताही नियम केलेला नसतो. त्यामुळे याच घटनेतून बोध घेत आयसीसी पुढे नियम करते.

अशीच एक घटना क्रिकेटमध्ये घडली, ती देखील थेट विश्वचषकात. २१ वर्षांपुर्वी म्हणजेच १९९९ विश्वचषकात ही घटना घडली होती.

१५ मे १९९९ रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या दुसर्‍या सामन्यादरम्यान घडलेली ही घटना आहे. तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएला (Hansie Cronje) थेट कानात हेडफोन घालून मैदानावर बोलत असताना पकडले होते. हेडफोनच्या माध्यमातून तो तत्कालीन प्रशिक्षक बॉब वूल्मर (Bob Woolmer) यांच्याशी संवाद साधत होता.

ही संपूर्ण योजना प्रशिक्षक बॉब वूल्मर याची…

बॉब वूल्मर हे संपूर्ण क्रिकेट जगतात अतिशय हायटेक तंत्रज्ञान वापरणारे प्रशिक्षक म्हणून ज्ञात होते.  हेच तंत्रज्ञान त्यांनी खेळातही आणले होते. याचाच भाग म्हणजे भारत दक्षिण आफ्रिका सामना. यात ते चालू सामन्यादरम्यान कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि संघाचा प्रमुख गोलंदाज एलन डोनाल्ड (Allan Donald) याच्याशी संपर्क साधत असल्याचे दिसून आले होते. प्रेक्षक सोडा, संपुर्ण क्रिकेट विश्वच याने अवाक् झाले होते.

मैदानावर असलेला तेव्हाचा भारताचा युवा प्रतिभावान खेळाडू सौरव गांगुलीने याची तक्रार मैदानावरील पंचांकडे केली होती. याचमुळे त्या सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या तलत अली (Talat Ali) यांनी ही प्रशिक्षक-कर्णधाराची चोरी अखेर पकडली. जेव्हा सामन्याचा पहिला ड्रिंक ब्रेक झाला तेव्हा तलत अली थेट दक्षिण आफ्रिकन संघाच्या ड्रेसिंग रूममध्येच गेले आणि त्यांनी प्रशिक्षक वूल्मर यांना असे करण्यापासून रोखले.

https://twitter.com/joybhattacharj/status/1261267946183131137

ही संपूर्ण योजना बॉब वूल्मर यांची होती. अमेरिकन खेळांपासून प्रेरित होऊन त्यांनी ही योजना आखली होती. असं काहीतरी मैदानात चालू सामन्यादरम्यान वापरणे चुकीचे आहे, असे सिद्ध करणारा नियम त्यावेळी आयसीसीच्या नियमांमध्ये नव्हता. परंतु याच घटनेमुळे आयसीसीने पुढे असे कोणतेही उपकरण चालू सामन्यादरम्यान वापरणाऱ्यावर बंदी आणली.

ब्राइटनच्या काउंटी ग्राऊंड येथे झालेल्या या सामन्यात सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) भारतासाठी ९४ धावांची शानदार खेळी साकारली होती, परंतु, जॉन्टी रोड्स (Jonty Rhodes) आणि जॅक कॅलिस (Jacques Kallis) यांच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे तो शतक पूर्ण करू शकला नाही.

या सामन्यात गांगुलीशिवाय राहुल द्रविड (Rahul Dravid) यानेही अर्धशतक झळकावले होते, या दोघांच्या चांगल्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॅलिसने ९६ धावांची संघासाठी उपयुक्त अशी खेळी केली. या मॅचविनिंग खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने भारताला १६ चेंडू आणि ४ गडी राखून पराभूत केले.

पराभवाच्या रागाने चाहत्याने केला संघावर हल्ला

भारतीय संघाच्या या पराभवामुळे चाहते निराश झाले. सामना संपल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होते. तेव्हा एका भारतीय चाहत्याने भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतू अझरने त्या चाहत्याला धक्का दिला. त्यानंतर त्या रागावलेल्या चाहत्याने द्रविडच्या दिशेने धाव घेतली पण भारतीय खेळाडूंनी त्याला मागे ढकलुन टाकले.

शेवटी द्रविडच्या मागे असलेला व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) रागाच्या भरात त्या चाहत्याच्या मागे धावत गेला. प्रसाद यांना आपल्याकडे येताना पाहून, तो चाहता घाबरला आणि धावता-धावता खाली पडला. त्यानंतर पोलिसांनी त्या चाहत्याला ताब्यात घेतले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---