पाकिस्तानचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. उभय संघात ७ मे पासून हरारे येथे दुसरा कसोटी सामना चालू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या पाकिस्तान संघाने ५१० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात यजमान झिम्बाब्वे संघ १३२ धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे फॉलोऑनसाठी झिम्बाब्वे संघ मैदानावर उतरला आहे. आज (१० मे) सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असून झिम्बाब्वे संघ बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे.
या सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांचे हे युद्ध एक षटक पूर्ण होईपर्यंत पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, झिम्बाब्वे संघाचा दुसरा डाव चालू असताना ४८ व्या षटकापर्यंत त्यांचा संघ ४ बाद १७५ धावांवर होता. अशात पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली डावातील ४९ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील तिसरा चेंडू फलंदाजी करत असलेल्या ल्यूक जॉन्ग्वेच्या पायाला लागला. तरीही जॉन्ग्वे काहीही न बोलता शांत थांबला होता. परंतु विकेट मिळत नसल्याने चिडलेल्या हसनने त्याला उसकावण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर जॉन्ग्वेही थोडा आक्रमक झाला. त्याने पुढील चेंडूवर खणखणीत चौकार मारत हसनला प्रत्युत्तर दिले. पुढे तो स्वतच स्वतशी काहीतरी पुटपुटला. यावेळी चिडलेल्या हसनने त्याच्याशी वाद घालण्याची संधी गमावली नाही. तो रागारागाने जॉन्ग्वेच्या जवळ गेला आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर हसनने पुढील चेंडू टाकला. यावर जॉन्ग्वेने मुद्दाम मागे हटत तो चेंडू खेळला नाही आणि तो हसनकडे पाहात गालातल्या गालात हसू लागला.
अशाप्रकारे हसनचे पूर्ण षटक संपेपर्यंत त्यांच्यातील वाद चालू राहिला. या मजेशीर वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
In case you missed it.
Dear Hassan, if you dish it out, you must be able to take it also! The walk away sealed the W #ZIMvPAKCredit: Rabbitholebd Sports pic.twitter.com/meBMuHkXMW
— Mamzi (@GodwillMamhiyo) May 9, 2021
जॉन्ग्वेविषयी बोलायचे झाले तर, तो सामन्याच्या चौथ्या दिवशीही संघासाठी चिवट झुंज देताना दिसत आहे. तो नाबाद ३० धावांवर फलंदाजी करत आहे. दुसरीकडे हसनला अद्याप झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावात एकही विकेट घेता आली नाहीये. तो अद्याप १० षटके गोलंदाजी करताना ९ धावा देत एकही विकेट घेऊ शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
बलाढ्य मुंबई इंडियन्सला मिळणार ‘या’ धुरंधरांची साथ, मिड सिजनमध्ये होऊ शकतात ताफ्यात दाखल
‘असे केले नसते तर आज बाबा आमच्यासोबत नसते,’ अश्विनने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग
भारत नव्हे तर ‘या’ देशात होणार आयपीएल २०२१चे उर्वरित सामने, बीसीसीआय अध्यक्षाने दिला इशारा