ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या डावखुऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सोमवारी (1 जानेवारी) रोजी याची घोषणा केली. 3 जानेवारीपासून पाकिस्तानविरुद्ध सुरू होणारा कसोटी सामना त्याची निरोप सामना असेल. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) पोस्ट करत म्हणाला की, “2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यानच त्याने वनडे फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत यजमान भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. मला पत्नी कँडिस आणि तीन मुली आयव्ही, इस्ला आणि इंडीसोबत वेळ घालवायचा आहे.”
वॉर्नर म्हणाला, “मला फक्त कुटुंबाचे कर्ज फेडायचे आहे. विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. आणि भारताविरुद्ध जिंकणे ही मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे मला माहित आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी येथे आहे आणि मी पुढील दोन वर्षे सतत क्रिकेट खेळत राहिलो तर ते माझ्या गरजा माझ्याकडून शक्य तितक्या पूर्ण करू शकणार नाहीत.”
दरम्यान, वॉर्नरच्या निवृत्तीनंतर अशाही बातम्या समोर आल्या आहेत की, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सलामीवीर फलंदाज पुन्हा वनडे क्रिकेट खेळताना दिसू शकतो. पण वॉर्नर हा पुनरागमनाचा निर्णय त्यावेळी स्वतःचा फॉर्म लक्षात घेऊनच घेईल, असेही सांगितले जात आहे.
वॉर्नरने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 161 सामन्यात 45.30 च्या सरासरीने 6932 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 97.26 होता. या सलामीच्या फलंदाजाने 22 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. 2009 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वॉर्नर रिकी पाँटिंग, ऍडम गिलख्रिस्ट, मार्क वॉ, मायकेल क्लार्क आणि स्टीव्ह वॉ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक एकदिवसीय धावा करणाऱ्यांमध्ये सहाव्या स्थानावर होता. (Breaking! On the first day of the new year, a shock to cricket lovers, David Warner bids farewell to ODI cricket)
हेही वाचा
Happy New Year: 2023 ला निरोप देत श्रेयस अय्यरने चाहत्यांना नवीन वर्षाच्या दिल्या शुभेच्छा, खास व्हिडिओ केला शेअर
‘या’ 5 गोलंदाजांनी 2023 मध्ये केल्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शिकार, फक्त एका भारतीयाने मिळवले स्थान