एक वर्षांपूर्वी 18 जून 2017ला भारतीय संघाला मोठ्या निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे भारतीय चाहत्यांचीही मोठी निराशा झाली होती.
हा पराभव होता चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीतील आणि तोही पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध.
भारतीय कर्णधार विराट कोहलीची कर्णधार म्हणून ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेतील पहिला सामनाही भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळला होता.
या सामन्यात भारताने डकवर्थ लूईस नियमाने पाकिस्तानवर 124 धावांनी मोठा विजय मिळवत स्पर्धेची धडाक्यात सुरवात केली होती. त्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेचाही साखळी फेरीत पराभव केला होता. मात्र त्यांना श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिला.
पण साखळी फेरीतील दोन विजयांमुळे भारताने गुणतालिकेत ब गटात अव्वल क्रमांक पटकावला. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीतील सामना अ गटात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बांग्लादेश विरुद्ध झाला.
भारताने बांग्लादेशलाही पराभवाचा धक्का देत चॅम्पिअन्स ट्रॉफीत सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला होता. मात्र पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले.
पहिल्या सामन्यापेक्षा यावेळी मात्र भारताला चांगली सुरवात करता आली नाही. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणे पसंत केले होते. परंतू या निर्णयाला चूकीचे ठरवत पाकिस्तानच्या अझर अली आणि फखर जामन यांनी 128 धावांची सलामी भागिदारी रचली.
इतक्या दिवस चांगली होणारी भारताची गोलंदाजी या सामन्यात अचानक कमजोर दिसायला लागली. त्यात फखर जामनला भारताकडून जीवदान मिळाले. त्याचीच विकेट भारतासाठी नंतर डोकेदुखी ठरली. त्याने 114 धावा करत पहिलेच शतक ठोकले.
त्यानंतर आलेल्या बाबर आझम, मोहम्मद हाफीजनेही चांगली फलंदाजी करत पाकिस्तानला 338 धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची मजबूत फलंदाजी ढेपाळली.
पहिल्या 15 षटकातच भारताचा आर्धा संघ तंबूत परतला होता. विराट, रोहित शर्मा, युवराज सिंग, एमएस धोनी, शिखर धवन अशा मातब्बर फलंदाजांनाही खास काही करता आले नाही.
भारताकडून फक्त हार्दीक पांड्याने अर्धशतक करून लढत दिली पण त्याची एकाकी लढत भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. अखेर भारताचा डाव 30.3 षटकातच 158 धावांवर संपूष्टात आला आणि पाकिस्तानने चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
#OnThisDay a year ago, Pakistan's @FakharZamanLive scored his maiden ODI century and what a time to do it – the #CT17 final! 👏🇵🇰🏆 pic.twitter.com/frLDPeMslS
— ICC (@ICC) June 18, 2018
गतविजेत्या भारतीय संघासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. तर विराट कोहलीने कर्णधार म्हणून पहिलाच मोठा पराभव पाहिला होता. पण त्याचवेळी पाकिस्तानने केलेल्या उत्तम खेळाचे सर्वांनाच कौतुक वाटले.
महत्वाच्या बातम्या-
–दादा संघाची गेल्या ३४ वर्षातील आयसीसी क्रमवारीतील सर्वात निचांकी घसरण तर टीम इंडिया…
–फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने चक्क नाकारली ‘मॅन आॅफ द मॅच’
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात