आजपासून बरोबर २७ वर्षांपूर्वी ३० जुलै १९९० रोजी भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देवने इंग्लड विरुद्ध इंग्लंडमध्ये ४ चेंडूत ४ षटकार खेचून भारताला फॉलोव ऑन पासून वाचवले होते.
इंग्लंडमध्ये झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा लॉर्ड मैदानावर झाला. पहिल्या डावात यजमान इंग्लंड संघाने १६२ षटकांत ६५३ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावात भारताने ९ विकेट्सवर ४३० अशी होती आणि भारताला फॉलोव ऑन टाळण्यासाठी २४ धावांची गरज होती. मैदानात कपिल देव आणि नरेंद्र हिरवानी ही जोडी होती.
त्यावेळी कपिल देव यांनी एडी व्हेंमिंग्स या गोलंदाजाला ४ चेंडूत सलग ४ षटकार ठोकले. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच षटकात हिरवानी पहिल्याच चेंडूवर बाद झाले परंतु भारताने १ धावेने इंग्लंड विरुद्ध फॉलोव ऑन टाळला.
भारत या सामन्यात पुढे २४७ धावांनी पराभूत झाला. परंतु कपिल देव यांची ही खेळी आजही चाहते विसरले नाहीत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती आणि हा सचिनचा केवळ ८वा सामना होता तर भारतीय संघाचा कर्णधार होता मोहम्मद अझरुद्दीन.
त्या सामन्यातील धावफलक:
इंग्लंड:
पहिला डाव: ६५३/४ घोषित
दुसरा डाव: २७२/४ घोषित
भारत:
पहिला डाव: ४५४ सर्वबाद
दुसरा डाव: २२४ सर्वबाद
इंग्लंडने हा सामना २४७ धावांनी जिंकला.