बरोबर ६ वर्षांपुर्वी शाकिब अल हसनला स्वेअर लेगला फटका मारत एकेरी धाव घेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपले १०० वे शतक साजरे केले. तब्बल १० महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हा विक्रम झाला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू बनला.
१६ मार्च २०१२ साली एशिया कपमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने बांग्लादेश संघाविरूद्ध मिरपूर येथे झालेल्या सामन्यात ही शतकी खेळी केली होती.
एशिया कप २०१२चा हा चौथा सामना होता. बांग्लादेशचा कर्णधार मुशफिकूर रहीमने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीला बोलवले. तेव्हा गौतम गंभीर सोबत सलामीला आलेल्या सचिनने १४७ चेंडूंचा सामना करताना ११४ धावा केल्या होत्या. त्यात १२ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.
सचिनने २०११ च्या विश्वचषकात साखळी सामन्यात ९९वी शतकी खेळी केली होती. त्यानंतर तो इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. तसेच भाततातही विंडीज सोबत सामने खेळला परंतू १००व्या शतकाने त्याला हूलकावणी दिली होती.
हेही जाणून घेणं गरजेचं!!!
-त्यानंतर २ दिवसांनी अर्थात १८ मार्च २०१२ रोजी सचिन पाकिस्तान संघाबरोबर आपला शेवटचा वनडे सामना खेळला. परंतू हा त्याचा शेवटचा वनडे सामना असेल असे तेव्हा कुणालाही वाटले नाही कारण वनडेतील निवृत्तीची घोषणा सचिनने २३ डिसेंबर २०१२ रोजी केली.
-सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीची अांतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५६ तर हशीम अमलाची ५४ शतके झाली आहेत. यातील विराटकडे या विक्रमाच्या आसपास पोहचण्याची क्षमता असल्याचे मत अनेक क्रिकेट पंडितांनी व्यक्त केले आहे.
This Year That Day.
16th March 2012.
100th 100. @sachin_rt #100thCentury #Sachin #Tendulkar pic.twitter.com/oNbexYW6A3— Sudesh Bhat (@DRadioVoice) March 16, 2018