---Advertisement---

तमाम क्रिकेटप्रेमींच्या आठवणीतील दिवस: जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिनने केलं होतं ‘शतकांचं शतकं’

On: गुरूवार, मार्च 16, 2023 9:57 AM
---Advertisement---

बरोबर 11 वर्षांपुर्वी शाकिब अल हसनला स्वेअर लेगला फटका मारत एकेरी धाव घेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने आपले 100 वे शतक साजरे केले. तेव्हा तब्बल 10 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हा विक्रम झाला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला होता.

16 मार्च 2012 साली एशिया कपमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने बांग्लादेश संघाविरूद्ध मिरपूर येथे झालेल्या सामन्यात ही शतकी खेळी केली होती. एशिया कप 2012 स्पर्धेचा हा चौथा सामना होता. बांग्लादेशचा कर्णधार मुशफिकूर रहीमने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीला बोलवले. तेव्हा गौतम गंभीर सोबत सलामीला आलेल्या सचिनने 147७ चेंडूंचा सामना करताना 114 धावा केल्या होत्या. त्यात 12 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.

सचिनने 2011 च्या विश्वचषकात साखळी सामन्यात 99वी शतकी खेळी केली होती. त्यानंतर तो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. तसेच भाततातही विंडीज सोबत सामने खेळला, परंतु 100व्या शतकाने त्याला हूलकावणी दिली होती. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी तब्बल 10 महिने त्याच्या या शतकाची वाट पहात होते.

हेही जाणून घेणं गरजेचं!!!

-त्या शतकानंतर 2 दिवसांनी अर्थात 18 मार्च 2012 रोजी सचिन पाकिस्तान संघाबरोबर आपला शेवटचा वनडे सामना खेळला. परंतू हा त्याचा शेवटचा वनडे सामना असेल असे तेव्हा कुणालाही वाटले नाही कारण वनडेतील निवृत्तीची घोषणा सचिनने 23 डिसेंबर 2012 रोजी केली.

-सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 70 शतके केली आहेत. यातील विराटकडे हा विक्रम मोडण्याची क्षमता आहे, असे मत अनेक क्रिकेट पंडितांनी व्यक्त केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलआधीच आरसीबीच्या वाटेत विघ्न! हुकमी एक्का संपूर्ण हंगामातून ‘आऊट’, बदली खेळाडू म्हणून हे नाव चर्चेत
मेव्हण्यासाठी कायपण! बायकोच्या बंधूसाठी रोहितने टाकली पहिल्या वनडेला सुटी, टीम इंडियाला सोडून ‘तिकडं’च लावणार हजेरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---