क्रिकेटमध्ये असे कितीतरी खेळाडू होऊन गेले, ज्यांना कारकिर्दीत चांगली खेळी करून सुद्धा त्यांना एक यशस्वी खेळाडू होता आले नाही. काहींनी एकदिवसीय सामने चांगले खेळले तर काहींनी कसोटी. ऑस्ट्रेलियाच्या माजी अष्टपैलू गॅरी गिलमोर यांचीही गोष्ट सुद्धा अशीच काहीशी आहे. या खेळाडूने विश्वचषक गाजवला. मात्र विश्वचषकात मोलाची कामगिरी करूनही कारकिर्दीत त्यांना केवळ ५ एकदिवसीय सामने खेळायला मिळाले.
असे खूप कमीवेळा पाहण्यास मिळते की, एखाद्या खेळाडूने चांगले प्रदर्शन करून सुद्धा त्यांना जास्त सामने खेळता येत नाहीत. यात ऑस्ट्रेलियन दिग्गज गॅरी गिलमोर यांचाही समावेश होतो. गिलमोर यांचा जन्म २६ जून १९५१ रोजी झाला होता. गिलमोर डावखुरे गोलंदाज होते. गोलंदाजीसोबत ते एक चांगले फलंदाज सुद्धा होते. पण गिलमोर यांची कारकीर्द जास्त काळ टिकली नाही.
त्यांनी कारकिर्दीतले सर्वात उत्तम प्रदर्शन १९७५च्या विश्वचषक सामन्यात केले होते. त्यांनी इंग्लंड विरुद्ध उपांत्यफेरीच्या सामन्यात लीड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला जिंकवून देण्यात मुख्य भूमिका बजावली होती. त्यांनी उपांत्यफेरी सामन्यात १४ धावा खर्च करून तब्बल ६ गडी बाद केले होते आणि फलंदाजी करताना नाबाद २८ धावांची खेळी केली होती. या प्रदर्शनामुळे त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
तसेच त्यांनी १९७५च्या विश्वचषक अंतिम सामन्यात ४८ धावा खर्च करत ५ गडी बाद केले होते. परंतु ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात वेस्ट इंडिजच्या २९२ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला. नंतर फिटनेस आणि दुखापतीमुळे गिलमोर सतत संघातून आत बाहेर होत राहिले. त्यामुळे त्यांची क्रिकेट कारकिर्द केवळ ४ वर्षांपुरती मर्यादित राहिली.
गिलमोर यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २० सामने खेळले होते. त्यात त्यांनी विश्वचषकसारख्या स्पर्धेत चांगले खेळून सुद्धा केवळ ५ एकदिवसीय सामने खेळले होते. गिलमोर यांनी एकूण १५ कसोटी सामने खेळले होते. कसोटीच्या २२ डावात त्यांनी ५४ गडी बाद केले होते. याबरोबरच फलंदाजी करताना ३ अर्धशतक आणि एका शतकाच्या मदतीने ४८३ धावा केल्या होत्या. याशिवाय अवघे ५ वनडे सामने खेळताना १६ विकेट्स आणि ४२ धावांची कमागिरी केली होती. त्यांचा मृत्यू १० जून २०१४ रोजी सिडनी येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
एक पराभव अन् कोहलीवर टीकांचा वर्षाव, पण त्याची ‘ही’ कामगिरी भल्याभल्याची बोलती करेल बंद
ऐतिहासिक कसोटीतील पराभवानंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय, इंग्लंड-श्रीलंकेला जाणार संघ निवडकर्ते!
अजिंक्यच्या कसोटी संघातील स्थानावर टांगती तलवार, ‘हे’ ३ खेळाडू घेऊ शकतात जागा