भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभला आहे. ज्यांनी भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यात मोलाचे योगदान दिले आहे. आजच्याच दिवशी म्हणजे २५ जून १९३२ रोजी भारतीय संघाने पहिला कसोटी सामना खेळला होता. हा सामना क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेला होता. सीके नायडू यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहून इंग्लिश खेळाडूंच्या पायाखालची जमीन सरकली होती.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार डगलस जार्डीनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भारतीय संघाकडून गोलंदाजी आक्रमणाची सुरुवात मोहम्मद निसार यांनी केली होती. त्यांची वेगवान गोलंदाजी पाहून इंग्लिश फलंदाजांचा थरकाप उडाला होता. अवघ्या १९ धावांवर ३ इंग्लंडचे फलंदाज पवेलियनमध्ये परतले होते. त्यांचे सलामी फलंदाज पर्सी होम्स आणि हर्बर्ट सटक्लिफची मोहम्मद निसारने दांडी गुल केली होती. तर फ्रँक वुली धावचीत होऊन माघारी परतला होता.
परंतु इंग्लिश कर्णधार डगलस जार्डीनने ७९ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. न्यूझीलंड संघाचा डाव २५९ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाकडून मोहम्मद निसार यांनी पहिल्याच कसोटी सामन्यात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. तर कर्णधार सीके नायडू यांनी देखील २ फलंदाजांना माघारी पाठवले होते. (On this day Indian team played their first test match against England in 1932)
दुखापतग्रस्त असतानाही खेळली ४० धावांची खेळी
भारतीय संघातील गोलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु फालंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्याचे पाहायला मिळाले होते. भारतीय संघाचा पहिला डाव १८९ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय कर्णधार सीके नायडू यांनी सर्वाधिक ४० धावांची खेळी केली होती. परंतु या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या हाताला दुखापत झाली होती.
दुसऱ्या डावात इंग्लंड संघाने ८ बाद २७५ धावांची खेळी केली होती. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जहांगीर खानने ६० धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते. इंग्लंड संघाने भारतीय संघासमोर विजयासाठी ३४६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना, भारतीय संघाला अवघ्या १८७ धावा करण्यात यश आले होते. या सामन्यात भारतीय संघ १५९ धावांनी पराभूत झाला होता.
सीके नायडू यांना म्हटले गेले “हिंदू ब्रॅडमन”
भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध एकच कसोटी सामना खेळायचा होता. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी काउंटी सामने खेळले. भारतीय कर्णधार सीके नायडू यांनी मिडलसेक्स आणि समरसेट संघाविरुद्ध उत्कृष्ट शतक झळकावले होते. त्यांनी तब्बल १६१३ धावा केल्या होत्या. यासोबतच त्यांनी ५९ गडी बाद केले. तसेच ३२ षटकार देखील लगावले होते. एका इंग्लिश वृत्तपत्रात त्यांचा ‘हिंदू ब्रॅडमन’ म्हणून उल्लेख करण्यात आला होता. तसेच त्यांना ‘हिंदू ब्रॅडमन’ या कारणामुळे ही म्हटले जायचे की, ते मुंबई जिमखाण्यात हिंदू संघाकडून खेळत असत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची ३९ वर्षे
ENG vs NZ | डॅरिल मिचलचे मालिकेतील तिसरे शतक, मोडला सचिन अजहर अन् चंद्रपालचा विक्रम
आयपीएलचा फॉर्म रणजी ट्रॉफीमध्ये कायम, मुंबईविरुद्ध एमपीसाठी पाटीदारचे धमाकेदार अर्धशतक