गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार कपिल देव यांच्यात तुलना होत आहे.
हार्दिक पंड्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये गेल्या एक दिड वर्षापासून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अनेकांनी भारताला दुसरा कपिल देव मिळाला असे मत व्यक्त केले होते.
मात्र माजी फलंदाज सुनिल गावसकरांना महान माजी कर्णधार कपिल देव आणि हार्दिक पंड्या यांच्यातील तुलना मान्य नाही.
“कपिल देव यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. ते सर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडूलकर सारख्या शतकातून एकदाच जन्माला येणाऱ्या खेळाडूसारखे आहेत. त्यामुळे कपिल देव यांच्याशी तुलनेला कोणीही पात्र नाही.” असे सुनिल गावसकर एका कार्यक्रमात म्हणाले.
तसेच पुढे गावसकरांनी भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या फलंदाजीच्या शैलीवरही नाराजी व्यक्त केली.
“शिखरला कसोटी क्रिकेटसाठी त्याची फलंदाजीची शैली बदलण्याची थोडीही इच्छा नाही. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या शैलीमुळे त्याला धावा मिळतात. पण कसोटीमध्ये क्षेत्ररक्षण वेगळे असते त्यामुळे त्याच्याकडून चांगली कामगिरी होत नाही.” असे मत सुनिल गावसकरांनी व्यक्त केले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-मोहम्मद सिराज चमकला; टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या विजयाकडे वाटचाल
-सहाव्या टी२० सामन्यात स्म्रीती मानधनाची सहावी धमाकेदार खेळी