गतविजेता इंग्लंड संघाला विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला 9 विकेट्सने वाईटरीत्या हरवले. या लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंड संघावर चोहोबाजूंनी टीका झाली होती. मात्र, संघाचा माजी कर्णधार ऑयन मॉर्गन याने इंग्लंडला भक्कम पाठिंबा दिला आहे. तो म्हणाला आहे की, फक्त एका पराभवाने संघावर तितका परिणाम होणार नाही. संघ चांगल्याप्रकारे पुनरागमन करेल.
काय म्हणाला मॉर्गन?
इंग्लंडचा दारुण पराभव होऊनही ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) याने इंग्लंड संघावर विश्वास दाखवला आहे. त्याने आयसीसी वेबसाईटसाठी लिहिलेल्या आपल्या स्तंभात म्हटले, “न्यूझीलंडचा दिवस चांगला राहिला आआणि इंग्लंडला वाईटरीत्या पराभवाचा सामना करावा लागला. जर इंग्लंड संघाने आणखी 30 धावा केल्या असत्या, तर कदाचित त्यांना त्याचाही बचाव करता आला नसता. कारण, त्यांची गोलंदाजी तितकी चांगली नव्हती. इंग्लंडच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली, पण ते त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. काही प्रमाणात म्हणायचं झालं, तर न्यूझीलंडने त्यांना बाद नाही केले, तर ते स्वत:च बाद होत गेले. मात्र, एक गोष्ट आहे की, एका पराभवाने इंग्लंडच्या विश्वचषकातील अभियानाला झटका लागला नाहीये.”
खरं तर, इंग्लंड संघाची फलंदाजी या सामन्यात तितकी चांगली राहिली नाही. जो रूट याच्याव्यतिरिक्त सर्व फलंदाज तंबूत परतले. रूटने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 86 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या.
सामन्याचा आढावा
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंड संघ खास प्रदर्शन करू शकला नाही. न्यूझीलंडने या एकतर्फी सामन्यात इंग्लंडला पराभूत करत मागील विश्वचषकातील अंतिम सामन्याचा बदला घेतला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात एकूण 9 विकेट्स गमावत 282 धावा केल्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंडने 36.2 षटकात 1 विकेट गमावत 283 धावा करत सामना खिशात घातला. न्यूझीलंडने 82 चेंडू शिल्लक ठेवत सामना जिंकला. त्यामुळे इंग्लंडचा नेट रनरेटही खूपच खराब झाला आहे. (one defeat will not derail england world cup campaign says former Captain eoin morgan)
हेही वाचा-
BREAKING: अभूतपूर्व गोंधळानंतरही कबड्डीचे गोल्ड भारताकडेच, इराणची झुंज अपयशी
अरेरे! CWC23च्या तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान दोनशेच्या आत All Out, बांगलादेशचे मेहिदी-शाकिब चमकले