जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीची सेना म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ मोठ्या अपेक्षांनी उतरला होता. १२ हंगामांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी तरी चषकावर आरसीबीचे नाव कोरले जाईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या एलिमिनेटर सामन्यात त्यांचा ६ विकेट्सने पराभव झाला. त्यामुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या आरसीबीला चाहत्यांनी निशाण्यावर धरले आहे. अशात एका चाहत्याने तर युझवेंद्र चहलला गजब सल्ला दिला आहे.
चहलच्या लायक नाही आरसीबी संघ!
हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर फिरकीपटू चहलने ट्विट करत “आम्ही दमदार पुनरागमन करु,” असे लिहिले. परंतु निराश झालेल्या काही चाहत्यांना ही गोष्ट पचली नाही. अशात एका चाहत्याने चहलच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘चहल तू आरसीबी संघ सोडून टाक आणि पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये सहभागी हो. तू अपमानाचा नाही, तर आयपीएल ट्रॉफीचा हक्कदार आहेस.’
थोडक्यात सांगायचे झाले, तर त्या चाहत्याला म्हणायचे होते की विराटपेक्षा जास्त मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा चहलचा योग्य वापर करुन घेईल.
https://twitter.com/Sirchahal/status/1324985134693511168?s=20
चहलने गाजवला आयपीएलचा तेरावा हंगाम
२०१३ साली चहलने मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये पाऊल ठेवले होते. परंतु त्याला केवळ एका सामन्यात मुंबईच्या अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळाले. त्यानंतर २०१४ साली आरसीबीने त्याला विकत घेतले. तेव्हापासून चहल आरसीबीचा हुकमी गोलंदाज बनला आहे.
भलेही आरसीबी संघ आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात धडक मारु शकला नसला. तरी चहलचे पूर्ण हंगामातील प्रदर्शन शानदार राहिले आहे. त्याने या हंगामात १५ सामने खेळले असून २१ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या १८ धावा देत ३ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘दहाव्या सामन्यानंतरच संघाची गाडी डगमगडली,’ आरसीबीच्या प्रशिक्षकाने मान्य केली चूक
OMG! महिला बिग बॅश लीगमधील ‘हा’ झेल तुम्ही पाहिलाय का? एकदा पाहाच
प्रसिद्ध समालोचकाचे होणार पुनरागमन; BCCI ने IPL कॉमेंट्री पॅनलमधून केलं होतं बाहेर
ट्रेंडिंग लेख-
बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा






