---Advertisement---

WTC Final 2025: ‘सर्वात जबरदस्त खेळी’, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केले एडेन मार्करमच्या फलंदाजीचे भरभरून कौतुक

On: रविवार, जून 15, 2025 4:14 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघाने मोठ्या काळानंतर एक मोठी यशस्वी कामगिरी त्यांच्या नावावर केली आहे. टेम्बा बावुमा च्या नेतृत्वात साउथ आफ्रिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 ट्रॉफी त्यांच्या नावावर केली आहे फायनल मध्ये संघाने ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्स ने पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला या विजयानंतर दक्षिण आफ्रिका ने 27 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकलेली आहे या आधी संघाने 1998 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती यावेळेसच्या विजयामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान एडेन मार्करम चे राहिलेले आहे ज्याने दुसऱ्या पारी मध्ये शानदार शतक झळकावत संघाला विजयाजवळ पोहोचवले होते.

दुसऱ्या डावात जेव्हा दक्षिण आफ्रिका संघ अडचणीत होता तेव्हा एडेन मार्करम सावधानीने खेळत संघाला अडचणीतून बाहेर काढले. त्याने 207 चेंडूत 136 धावा केल्या ज्यामध्ये 14 चौकार सामील होते. त्यावेळी संघाने 70 धावांवर 2 विकेट्स गमावल्या होत्या आणि लक्ष प्राप्त करणे कठीण वाटत होते. तेव्हा मार्करमने कर्णधार टेम्बा बावुमा सोबत मिळून शानदार 147 धावांची भागीदारी रचली. बावुमाने देखील 66 धावा करत महत्वाचे योगदान दिले. मार्करम च्या या शानदार पारीसाठी त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला.

इंग्लंडचे माजी खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकाचे मूळचे असलेले केविन पीटरसन यांनी मार्करम चे कौतुक करत म्हटले की, कदाचित ही कसोटी क्रिकेट इतिहासातील कोणत्याही दक्षिण आफ्रिका खेळाडू फलंदाजांची सर्वोत्तम खेळी होती.

पीटरसनने म्हटले की, ही खेळी खूप आक्रमक किंवा मनोरंजक न्हवती पण परिस्थिती आणि दबावाच्या दृष्टीने हे प्रदर्शन कमालीचे होते. पहिल्या डावातील अपयशानंतर ज्या प्रकारे त्याने पुनरागमन केले ते कौतुकास्पद आहे. तुम्हाला माहित आहे की, संपूर्ण देशाला तुमच्याकडून अपेक्षा आहे तेव्हा दबाव जास्त वाढतो. जेव्हा रियान रिकेल्टन लवकर बाद झाला तेव्हा संघावर खूप जास्त दबाव होता, पण मार्करमने धाडसाने खेळ खेळला आणि संघाला विजय मिळवून दिला. तसेच या विजयाने दक्षिण आफ्रिका संघाने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---