आपण क्रिकेटच्या मैदानात एकापेक्षा एक झेल पाहिले आहेत. सोशल मीडियावर असाच एक झेल सध्या व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाली बिग बॅश लीग ही टी-20 जगभरात लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला झेल हादेखील बीबीएल सामन्यादरम्यान पकडला गेला. हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम झेल असल्याचे काही चाहत्यांकडून बोलले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत फलंदाज मैदानात समोरच्या बाजूला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. मात्र, चेंडू बॅठवर नीट न आल्यामुळे हा शॉट थेट सीमारेषेपार जात नाही. श्रेत्ररक्षण करताना 30 यार्ट सर्कलच्या आतमध्ये थांबलेला खेळाडू हा चेंडू झेलण्यासाठी वेगाने धाव सुटल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. सुरुवातीला अशक्य वाटणारा झेल या खेळाडूने सीमारेषेच्या जवळ पोहोचल्यानंतर पकडला. खेळाडू उलट्या दिशेने धावत असल्यामुळे झेल पकडणे त्याच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते.
चेंडू पकडल्यानंतर हा खेळाडू सीमारेषेपार जाणार, जे निश्चित होतो. पण त्याआधीच त्याने हा चेंडू मागच्या बाजूला हवेत फेकला. सहकारी खेळाडूला आधीपासून आपली जबाबदारी आधीपासून माहित होते. सीमारेषेपार जाण्याआधी खेळाडूने हवेत टाकलेला चेंडू सहकाऱ्या कुठलीच चूक न करता झेलला. हा व्हिडओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
WHAT A CATCH…..!!!!! 🔥🫡
– One of the greatest fielding efforts in cricket history. [Rob Moody]pic.twitter.com/1ScwmXBz5P
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2024
चाहत्यांना हा झेल खूपच भावला आहे. सोशल मीडियावर याची सर्वत्र चर्चा देखील सुरू आहे. काही चाहते हा क्रिकेटच्या इतिहिसातील सर्वोत्तम झेल आहे, असे बोलत आहेत. तर काहींनी क्रिकेट इतिहासात श्रेत्ररक्षकाचे हे सर्वोत्तम प्रयत्न आहेत, असे म्हणत आहेत. हा झेल पाहिल्यानंतर मैदानातील प्रत्येकजण हैराण होता. चाहत्यांसह फलंदाजालाही काही क्षमांसाठी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. इच्छा नसतानाही फलंदाजाला खेळपट्टी सोडावी लागली. (One of the greatest fielding efforts in cricket history. Watch Video)
महत्वाच्या बातम्या –
IND vs AFG: ही तर धोनीची कृपा! सामनावीर ठरल्यानंतर शिवम दुबेने दिले कॅप्टन कुलला श्रेय
Bangladesh Cricket । नजमूल हसन यांचा मोठा निर्णय! सोडणार बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद