आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) रविवारी (१२ एप्रिल) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले आहे. यामध्ये मागील ३ वर्षांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि अव्वल क्रमांकावर असणाऱ्या खेळाडूच्या नावाचा खुलासा केला आहे.
आयसीसीने केलेल्या ट्वीटनुसार, सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पहिल्या २ क्रमांकावर भारतीय संघाचे दोन धडाकेबाज फलंदाज आहेत. यामध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अव्वल क्रमांकावर आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Most international runs since January 2017:
🇮🇳 Virat Kohli ➔ 8,465 @ 63.17
🇮🇳 Rohit Sharma ➔ 6,350 @ 54.27
🏴 Joe Root ➔ 6,203 @ 48.08
🇵🇰 Babar Azam ➔ 5,387 @ 51.30
🇳🇿 Ross Taylor ➔ 4,801 @ 51.07 pic.twitter.com/8oygdKq6oP— ICC (@ICC) April 12, 2020
आयसीसीने आपल्या ट्वीटमध्ये विराट, रोहित, जो रूट, बाबर आझम आणि रॉस टेलर यां खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच जानेवारी २०१७पासून आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या या खेळाडूंना एक क्रम दिला आहे.
विराट या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. कारण त्याने या दरम्यान ६३. १७ च्या सरासरीने तिन्ही क्रिकेट प्रकारात जवळपास ८,४६५ धावा केल्या आहेत. तर रोहित या यादीत ५४. २७च्या सरासरीने ६,३५० धावा करत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
तसेच रूट (Joe Root) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने मागील ३ वर्षांमध्ये ४८. ०८ च्या सरासरीने ६,२०३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आझम (Babar Azam) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ५१.३० च्या सरासरीने ५३८७ धावा केल्या आहेत. तर टेलर (Ross Taylor) या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने ५१. ०७च्या सरासरीने ४,८०१ धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विलियम्सनला (Kane Williamson) या यादीत सामील न करणे आश्चर्यकारक आहे. तर ऑस्ट्रेलियाचा (Australia) अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथवर (Steve Smith) मागील वर्षी लागलेल्या बंदीमुळे त्याला या यादीत स्थान दिलेले नाही.
आयसीसीनुसार अव्वल ५ फलंदाजांना निवडण्यासाठी तयार केलेल्या आधारानुसार रूट आणि विलियम्सन यामध्ये बसत नाहीत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जी गोष्ट धोनीने गेल्या १० वर्षात नाही केली ती या वर्षी करत होता
-रोहित जेव्हाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो तेव्हा त्यांना नडतोच
-३ अशा चुका, ज्यामुळे विश्वचषकात भारताला झालेत मोठे तोटे