पुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत ओएनजीसी संघाने बीपीसीएल संघाचा 36-28 असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत आक्रमक लढतीत ओएनजीसी संघाने सुरूवातीपासून आक्रमक खेळ करत बीपीसीएल संघाचा 36-28 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. सामन्याच्या पहिल्या सत्रात संघर्षपुर्ण लढतीत 8-9 असे गुण असताना बीपीसीएलच्या निलेश शिंदेने खोल चढाई करत दोन गुण मिळवेले व सामना 9-9 असा बरोबरीत आणला.
मध्यंतरापुर्वी ओएनजीसी संघाने बीपीसीएलचा पुर्ण संघ बाद करून लोन चढवले व बीपीसीएल संघाचे मनोबल खच्ची करत मध्यंतरापुर्वी 15-9 अशी आघाडी घेतली. बीपीसीएल संघाचे रिशांक देवाडीगा व गिरिष एर्नाक दुखापतीमुळे त्यांचा खेळ दाखवता आला नाही. त्यामुळे संपुर्ण स्पर्धेत न खेळलेल्या नितिन मदनेला सामन्याच्या उत्तरार्धात रेडर म्हणुन मौदानात उतरावे लागले.
सामन्याच्या दुस-या सत्रात ओएनजीसी संघाच्या राजेश नरवालला पिवळे कार्ड देण्यात आले. काशिलींग अडकेने खोल चढाया करून संघाचे गुण वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र ओएनीजीसी संघाने घेतलेली आघाडी कायम राखत बीपीसीएल संघाचा 36-28 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
तिस-या क्रमांकाच्या लढतीत एमआरपीएल संघाने सीपीसीएल संघाचा 31-12 असा एकतर्फी पराभव केला. स्टिवन व सुकेश यांच्या खोल चढायांच्या बळावर एमआरपीएल संघाने मोठा विजय संपादन केला. सुकेशने 9 चढायांमध्ये 7 गुण मिळवले तर स्टिवनने 10 चढायांमध्ये 8 गुण मिळवले. मनोजने कौशल्यपुर्ण पकडी करून सीपीसीएल संघाचे मनोबल खच्ची करत 4 गुण मिळवले व संघाला मोठा विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीपीसीएलचे(मनुष्यबळ विभाग)कार्यकारी संचालक आर.आर. नायर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक(डीजीएम) देवेंद्र जोशी, पीएसपीबी चे सचिव हाल्डर, पुण्याचे क्सटम कमिशनर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- तिसरा क्रमांकासाठी लढत
एमआरपीएल वि.वि सीपीसीएल 31-12(19-8 मध्यांतरापुर्वी)
अंतिम फेरी- ओएनजीसी वि.वि बीपीसीएल 36-28(15-9 मध्यांतरापुर्वी)
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट रेडर- दिपक नरवाल (ओएनजीसी)
सर्वोत्कृष्ट कॅचर –गिरिष इर्नाक (बीपीसीएल)
सर्वोत्कृष्ट खेळाडू- जोगिंदर (ओएनजीसा)