दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर रविवारी (२४ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही आशियातील बलाढ्य संघ समोरासमोर होते. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, पाकिस्तान संघाने खेळाच्या तिन्ही प्रकारात चमकदार कामगिरी करून भारतीय संघावर १० गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताचे पाकिस्तानवरील २९ वर्षापासून विश्वचषकातील विजयाचे सत्र थांबले. या पराभवानंतर मात्र भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर अनेकांनी अत्यंत खालच्या दर्जाची टीका करण्यास सुरुवात केली आहे.
शमीवर होत आहे टीका
विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाल्याने अनेक क्रिकेटप्रेमी कमालीचे नाराज झाले आहेत. काहींनी खेळाडूंवर वैयक्तिक टीका करण्यास सुरुवात केली असून, ही टीका अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत केली जातेय. पाकिस्तान विरुद्ध काहीसा महागडा ठरलेला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर तर अनेकांनी सांप्रदायिक व धार्मिक टीका करण्यास सुरुवात केली. अनेक ट्विटर हँडलवरून त्याला ‘भारतीय संघातील पाकिस्तानी’, तुला हे करण्याचे किती पैसे मिळाले तसेच त्याच्या धर्मावरून अपशब्द बोलले जात आहेत.
https://twitter.com/vaikivannavan/status/1452329026027151362?t=skwXPeDNoSJGc6Cnh_yJSg&s=19
These are some of the comments on Mohammed Shami’s Instagram account. The hyper-nationalist Indian cricket fans have unleashed worst form of communal abuse on Shami for India’s loss against Pakistan. Not surprised at all because this is what India is famous for. #IndvsPak pic.twitter.com/KCsSzAr5y3
— Saif (@isaifpatel) October 24, 2021
दुसरीकडे काही समजदार चाहत्यांनी शमीला पाठिंबा दर्शवला असून, हार-जीत हा खेळाचा भाग असल्याचे व ते खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग व माजी अष्टपैलू इरफान पठाण यांनीदेखील शमीच्या समर्थनात ट्विट केले आहेत.
Even I was part of #IndvsPak battles on the field where we have lost but never been told to go to Pakistan! I’m talking about 🇮🇳 of few years back. THIS CRAP NEEDS TO STOP. #Shami
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 25, 2021
We love you @MdShami11 🇮🇳 #Shami
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 25, 2021
पहिल्या सामन्यात महागडा ठरला शमी
पहिल्या सराव सामन्यात इंग्लंड विरुद्ध तीन बळी मिळवणारा शमी या सामन्यात महागडा ठरला. त्याने ३.५ षटके गोलंदाजी करताना ४५ धावा दिल्या. यामध्ये एकाही बळीचा समावेश नव्हता. त्याच्या गोलंदाजीवर एकूण सहा चौकार व एक षटकार लगावला गेला. या सामन्यात भारताचा एकही गोलंदाज बळी घेण्यात यशस्वी ठरला नाही व संघाला १० धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाचा पुढील सामना ३१ ऑक्टोबर रोजी याच मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध होईल.