आज न्यूझीलॅंडचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज राॅस टेलरचा ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. कालच या खेळाडूने इंग्लड विरुद्ध १४७ चेंडूत १८१ धावांची नाबाद वादळी खेळी केली.
राॅस टेलर हा जगातील ४था खेळाडू आहे ज्याने वाढदिवसाच्या दिवशीच वनडेत शतकी खेळी केली होती. त्याने ८ मार्च २०११ मध्ये विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध १२४ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या होत्या.
तेव्हा टेलरचे वय २७ वर्ष होते.
वाढदिवसाच्या दिवशी वनडेत पहिल्यांदा शतकी खेळी करण्याचा विक्रम विनोद कांबळी याच्या नावावर आहे. त्याने १८ जानेवारी १९९३ रोजी वयाच्या २१ वर्षी शतक केले होते. त्याने ही शतकी खेळी इंग्लड संघाविरुद्ध केली होती.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वयाच्या २५व्या वाढदिवसाच्या दिवशी आॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध शारजात १३४ धावांची खेळी केली होती.
सनथ जयसुर्याने ३९व्या वाढदिवसाच्या दिवशी बांगलादेश संघाविरुद्ध १३० धावांची खेळी कराची शहरात केली होती.