सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लंडनच्या के ओव्हल मैदानात सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विकेट्स गमावत 469 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शुबमन गिल स्वस्तात बाद झाले. पॅट कमिन्स याने रोहितला, तर स्कॉट बोलँड याने शुबमन गिल याला तंबूचा रस्ता दाखवला.
ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर भारतासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल (Rohit Sharma And Shubman Gill) यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी भारताला रोहितच्या रूपात 30 धावांवर पहिला धक्का बसला. पॅट कमिन्स (Pat Cummins) याने रोहितला वैयक्तिक 15 धावसंख्येवर बाद केले. यानंतर भारताला दुसरा धक्का 30 धावसंख्येवरच बसला. स्कॉट बोलँड (Scott Boland) याने शुबमन गिल (Shubman Gill) याला 13 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर त्रिफळाचीत बाद केले.
शुबमनलाही बसला नाही विश्वास
शुबमन ज्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद झाला, तो चेंडू त्याने सोडला होता. मात्र, चेंडू थेट यष्टींवर जाऊन लागला. यावेळी शुबमनला वाटले होते की, चेंडू उसळी घेऊन यष्टींच्या वरून निघून जाईल, पण त्याचा हा अंदाज चुकीचा ठरला. शुबमनला विश्वास बसला नाही की, तो बाद झाला आहे. गिल याने 15 चेंडूचा सामना करत 2 चौकारही मारले.
बोलँड खेळतोय 8वा कसोटी सामना
दुसरीकडे, स्कॉट बोलँड त्याच्या कसोटी कारकीर्दीतील फक्त 8वा कसोटी सामना खेळत आहे. त्याने यापूर्वी 13 डावांमध्ये 28 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 14 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले आहेत. त्याने वनडेत 16, तर टी20त 3 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 339 विकेट्सचा समावेश आहे. (opener shubman gill bowled by scott boland in wtc final 2023 india vs australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final मधील सर्वात भारी क्षण, भज्जीने दिला पाकिस्तानच्या चिमुकल्या चाहत्याला ऑटोग्राफ; Video Viral
आनंदवार्ता! बेअरस्टोच्या गर्लफ्रेंडच्या पोटी बाळाने घेतला जन्म, इंस्टावरून स्वत: दिली माहिती






