भारतीय संघासाठी शुक्रवारी (15 सप्टेंबर) शुबमन गिल सलामीला आला. सलामीवीर रोहित शर्मा एकही धाव न करता झेलबाद झाला. पण शुबमन गिल (Shubman Gill) दुसऱ्या बाजूला संयमी खेळ दाखवत होता. गिलला याच संयमाच्या बदल्यात मोठी खेळी करता आली. 61 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार ठोकत त्याने शतक केले.
तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्मा 2 चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला तिलक वर्मा 9 चेंडूत 5 धावा केल्या आणि त्रिफळाचीत झाला. चौथ्या क्रमांकावर केएल राहुल आला आणि खेळपट्टीवर फाय जमवू लगला होता. मात्र, राहुलने देखील 39 चेंडूत 19 धावा केल्या आणि झेलबाद झाला. (Opener Shubman Gill’s half century against Bangladesh)
A well made and steady half-century by @ShubmanGill ????
His 9th in ODIs.
Live – https://t.co/Qi56Y95GFN… #INDvBAN pic.twitter.com/79UjVkF14s
— BCCI (@BCCI) September 15, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश – लिटन दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन, अनमूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
महत्वाच्या बातम्या –
रोहित-तिलकच्या निराशाजनक विकेट्स, वेगवान गोलंदाजामुळे बांगलादेशची शानदार सुरुवात
शाकिबच्या धमाक्यामुळे बांगलादेशची आव्हानात्मक धावसंख्या! भारतासाठी शार्दुल पुन्हा चमकला