केरळचा युवा फलंदाज मोहम्मद अजहरुद्दीन याने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत केरळ विरुद्धच्या लढतीत चमकदार कामगिरी करत मुंबईच्या गोलंदाजांना आपल्या वादळी फलंदाजीने चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. त्याने ३७ चेंडूमध्ये शतक झळकावून मुंबईविरुद्द विक्रमी खेळली होती ज्याने केरळला विजय मिळवून दिला होता. आता त्याचा समवेश आयपीएल लिलावामध्ये झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा बोली लावली जाणार आहे.
आयपीएलचा लिलाव हा येत्या १८ फेब्रुवारीला होणार असून या लिलावासाठी मोहम्मद अजरुद्दिन याने आपली आधारभूत किंमत २० लाख इतकी ठेवली आहे. त्याच्यावर मोठी बोली लागेल अशी अनेकांची अपेक्षा आहे. या फलंदाजाने सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत विक्रमी शतक झळकावले होते. मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याने ५४ चेंडूचा सामना करत ९ चौकार आणि ११ षटकांच्या सहाय्याने नाबाद १३७ धावा काढल्या होत्या.
केरळच्या या फलंदाजाने भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या समवेत सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मोहम्मद अजहरुद्दीनने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “माझं स्वप्न आहे की विराट कोहलीसह मी डावाची सुरवात करेन. माझ्या खेळात मी माझे सर्वोत्तम देईन, बाकीच्या गोष्टी माझ्या नियंत्रणाखाली नाहीत. मला फरक नाही पडत की संधी मिळेल की नाही. माझ्या संघाला जिंकवून देणे इतकेच माझे लक्ष्य असेल.”
आपल्या आणखी चार स्वप्नाबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मला आयपीएलमध्ये खेळायचे असून, रणजीच्या मोसमात चार शतके, स्वत:च घर आणि बेंझ कार घेणे या सर्व गोष्टी मला पूर्ण करायच्या आहेत. आणि हे सर्व मी माझ्या घराच्या भिंतीवर देखील लिहून टांगून ठेवले आहे. जेणेकरून मला माझे अचूक लक्ष्य साधता येईल.”
साल २०१५ च्या घरगुती क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या क्रिकेटपटूने एकूण १९ टी२० सामने खेळले असून ४०४ धावा काढल्या आहेत त्यावेळी त्याची सरासरी २३.७६ इतकी आहे.
सय्यद मुश्ताक आली करंडक स्पर्धेत मोहम्मदने दुसरे वेगवान शतक झळकावले होते, याअगोदर रिषभ पंतने २०१८ साली अवघ्या ३२ चेंडूत शतक झळकावले होते. रोहित शर्मा आणि रिषभ पंतच्या नंतर वेगवान शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला.
आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी १११४ खेळाडूंनी नोंदणी केली होती. ८ संघांनी निवडलेल्या खेळाडूंची यादी सादर केल्यानंतर २९२ खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ज्यात हरभजन सिंग, स्टीव्ह स्मिथ, साकीब अल हसन यांसारख्या खेळाडूंचा समावेश असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 2nd Test Live: रोहित-रहाणेची शतकी भागीदारी; भारताच्या दुसऱ्या सत्राखेर ३ बाद १८९ धावा
शतक एक पराक्रम अनेक! रोहित शर्माने शतकी खेळीसह केले ‘हे’ मोठे विक्रम
शर्माजी का बेटा ‘हिट’, शतकासह ‘या’ विक्रमात टाकलं गावसकरांनाही मागे