पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 18वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात सिद्धार्थ मराठे याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. तर, मुलींच्या गटात श्रावणीदेशमुख व आन्या जेकब यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे बालेवाडी या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात सिद्धार्थ मराठेने काल अव्वल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या सार्थ बनसोडेचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. चौथ्या मानांकित निशित रहाणे याने सातव्या मानांकित ओमर सुमरचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटात श्रावणी देशमुखने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या देवांशी प्रभुदेसाईचा 6-4, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित आन्या जेकब हिने क्वालिफायर श्रावणी खवळेचा 5-7, 6-2, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात जय पवार व सिद्धार्थ मराठे यांनी आर्यन कोटस्थाने व ओमर सुमर या तिसऱ्या मानांकित जोडीचा 6-2, 7-6(8-6) असा पराभव केला. मुलींच्या गटात देवांशी प्रभुदेसाईने सिया प्रसादेच्या साथीत सोहा पाटील व सिद्धी खोत यांचा 6-2, 6-1 असा तर, वैष्णवी सिंग व श्रुती नानजकर यांनी रितिका मोरे व श्रेया पठारे यांचा 6-4, 2-6, 10-8 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
निकाल: मुली: उपांत्य फेरी:
श्रावणी देशमुख वि.वि.देवांशी प्रभुदेसाई 6-4, 6-2;
आन्या जेकब[2] वि.वि.श्रावणी खवळे 5-7, 6-2, 6-4;
मुले:
सिद्धार्थ मराठे वि.वि.सार्थ बनसोडे 6-1, 6-1;
निशित रहाणे[4]वि.वि.ओमर सुमर[7] 6-2, 6-3;
दुहेरी गट: मुले:
जय पवार/सिद्धार्थ मराठे वि.वि.आर्यन कोटस्थाने/ओमर सुमर[3] 6-2, 7-6(8-6);
सार्थ बनसोडे/अर्जुन अभ्यंकर[2]वि.वि.अर्णव कोकणे/अनिश रांजलकर[4] 6-3, 7-6(5);
मुली:
देवांशी प्रभुदेसाई/सिया प्रसादे वि.वि.सोहा पाटील/सिद्धी खोत 6-2, 6-1;
वैष्णवी सिंग/श्रुती नानजकर वि.वि.रितिका मोरे/श्रेया पठारे[4]6-4, 2-6, 10-8.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत मालिका गमावणार? दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू चौथ्या टी२०मध्ये करू दमदार शकतो पुनरागमन
‘कर्णधार’ हार्दिक मैदानात उतरताच ६३ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची होणार पुनरावृत्ती, असेल पाचवा संघनायक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी२० सामना होऊ शकतो रद्द? हे आहे मोठे कारण