इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात अनेक भारतीय खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या तीनही विभागात खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. यातच, गुरुवारी (5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने खास कामगिरी केली आहे. या सामन्यानंतर पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही मोठे बदल झाले आहेत.
जसप्रीत बुमराहने पर्पल कॅप केली नावावर
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 14 धावा देऊन 4 बळी घेतले. या सामन्यात 4 बळी घेत तो या हंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्यामुळे त्याने कागिसो रबाडाला मागे टाकत पर्पल कॅप मिळवली आहे. त्याने या हंगामात खेळलेल्या 14 सामन्यात 27 बळी घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आहे. त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या 15 सामन्यात 25 बळी घेतले आहेत.
ट्रेंट बोल्टने पर्पल कॅपच्या शर्यतीत गाठले तिसरे स्थान
आता मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने या हंगामात 14 सामने खेळले आहेत आणि 22 बळी घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर 14 सामन्यांत 20 गडी घेऊन या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिरकीपटू युजवेंद्र चहल 14 सामन्यांत 20 बळी घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे.
केएल राहुल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल
आयपीएलमध्ये सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल 14 सामन्यांत 670 धावा करत प्रथम स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर दुसर्या स्थानावर आहे. त्याने 14 सामन्यांत 529 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने 15 सामन्यात 525 धावा केल्या आहेत.
ईशान किशनने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गाठले चौथे स्थान
आता मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज फलंदाज ईशान किशनही ऑरेंज कॅपच्या शर्यतील बराच पुढे आला आहे. तो आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने 13 सामन्यात 483 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 5 व्या क्रमांकावर मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक आहे. त्यानेही 15 सामन्यांत 483 धावा केल्या आहेत.
युझवेंद्र चहल आणि रशिद खान यांच्याकडे असेल संधी
आयपीएलमध्ये शुक्रवारी(6 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एलिमिनेटर सामना होईल. त्यामुळे बंगलोरचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि हैदराबादचा फिरकीपटू रशीद खान मैदानात उतरतील. त्यामुळे त्यांच्याकडे पर्पल कॅप आपल्या नावावर करण्याची संधी असेल.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत होऊ शकतात बदल
त्याचबरोबर ऑरेंज कॅपबद्दल बोलायचे झाले, तर बंगलोरचा कर्णधार विराट कोहली, हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि बंगलोरचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल यांनाही ऑरेंज कॅप पटकावण्याची संधी असेल. या खेळाडूंमुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठे बदल होऊ शकतात.
#क्लालिफायर १ च्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असणारे ५ फलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज) –
१. केएल राहुल- 670 धावा, 14 सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
२. डेविड वॉर्नर – 529 धावा, 14 सामने (सनरायझर्स हैदराबाद)
३. शिखर धवन – 525 धावा, 15 सामने (दिल्ली कॅपिटल्स)
४. ईशान किशन – 483 धावा, 13 सामने (मुंबई इंडियन्स)
५. क्विंटन डी कॉक – 483 धावा, 15 सामने (मुंबई इंडियन्स)
#क्वालिफायर १ सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे ५ गोलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज) –
१. जसप्रीत बुमराह- 27 विकेट्स, 14 सामने (मुंबई इंडियन्स)
२. कागिसो रबाडा- 25 विकेट्स, 15 सामने (दिल्ली कॅपिटल्स)
३. ट्रेंट बोल्ट – 22 विकेट्स, 14 सामने (मुंबई इंडियन्स)
४. जोफ्रा आर्चर – 20 विकेट्स, 14 सामने (राजस्थान रॉयल्स)
५. युजवेंद्र चहल – 20 विकेट्स, 14 सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये झालं गणपती व लक्ष्मीचं दर्शन, पाहा फोटो
करावं ते तेवढं कौतूक कमीच! आयपीएलमध्ये कुणालाही न जमलेला विक्रम सूर्यकुमारच्या नावावर
फायनलपूर्वी मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढले, दोन वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेला खेळाडू दुखापतग्रस्त