क्रिकेट विश्वात एक आश्चर्यकारक घटना घडली आली आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ‘ओशेन थॉमस’ने (Oshane Thomas) अवघ्या 1 चेंडूत 15 धावा दिल्या. त्याच्या या गोलंदाजीमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती, कारण त्याचा 1 चेंडू फलंदाजांसाठी धावांची मशिन ठरला कारण डावाच्या पहिल्या चेंडूवरच संपूर्ण षटकाचा कोटा पूर्ण झाला.
‘बांगलादेश प्रीमियर लीग’मधील (Bangladesh Premier League) सामना खुलना टायगर्स विरूद्ध चितगाव किंग्ज संघात खेळला गेला. 2024चा हा शेवटचा दिवस वेस्ट इंडिजच्या गोलंदाजासाठी दुःस्वप्न ठरला. ओशेन थॉमस खुलना टायगर्ससाठी पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने सुरुवात खराब केली. त्याने त्याच्या षटकामध्ये नो आणि वाइड चेंडू टाकत 15 बनावट धावा दिल्या.
सतत वाइड्स आणि नो बॉलमुळे थॉमस खूपच त्रासलेला दिसत होता. त्याने पहिलाच चेंडू नो बॉल म्हणून टाकला आणि फलंदाजाला फ्री हिटची संधी मिळाली. फ्री हिट बॉलवर एकही धाव आली नाही. पण पुढच्याच चेंडूवर फलंदाजाने षटकार मारला आणि अंपायरने त्याला नो बाॅल घोषित केले. थॉमसने फ्री हिटवर सलग दोन वाइड टाकले, जेव्हा चेंडू सरळ गेला तेव्हा फलंदाजाने चौकार मारला. पण हा देखील नो बॉल होता. त्याने फक्त 1 चेंडू टाकला होता आणि 15 धावा धावफलकावर होत्या. तथापि, थॉमसने 18 धावा देत आणि एक विकेट घेतल्यानंतर कसे तरी षटक पूर्ण केले.
ओशेन थाॅमसच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने वेस्ट इंडिजसाठी 25 वनडे आणि 21 टी20 सामने खेळले आहेत. 25 वनडे सामन्यातील 24 डावात गोलंदाजी करताना 31 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 6.74 राहिला आहे, तर सरासरी 33.35 राहिली आहे. 21 टी20 सामन्यातील 20 डावात गोलंदाजी करताना त्याने 21 विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 21/5 अशी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये अनसोल्ड ठरलेल्या ‘या’ स्टार खेळाडूने झळकावले सलग तिसरे शतक
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्राॅफीमध्ये धमाकेदार खेळी
मोठी अपडेट; इंग्लंडविरूद्धच्या आगामी वनडे मालिकेतून रोहित, विराट बाहेर