पुणे, 9 डिसेंबर 2023: रग्बी इंडिया, स्पोर्टस ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात उस्मानाबाद अ(धाराशिव) संघाने विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत उस्मानाबाद अ (धाराशिव) संघाने कोल्हापूर अ संघाचा 15-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजयी संघाकडून प्रतीक्षा माळी(10गुण), अदिती राऊत(5गुण) यांनी सुरेख कामगिरी केली.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मृदुला मूर्ती(5गुण), आरती खांडेकर(10गुण) यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर सातारा अ संघाने मॅजिशियनचा 15-0 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत उस्मानाबाद अ(धाराशिव) संघाने सातारा अ संघाचा 5-0 असा तर, कोल्हापूर अ संघाने मॅजिशियनचा 10-0 असा पराभव अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय महिला रग्बी संघाच्या माजी कर्णधार वाहबिझ भरुचा यांच्या हस्ते करण्यात आले. (Osmanabad A (Dharashiv) team won the Khelo India Women’s Rugby League)
निकाल: 14 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
उस्मानाबाद अ(धाराशिव): 5(वैष्णवी कोळी 5) वि.वि.सातारा अ: 0;
कोल्हापूर अ: 10(वर्धा पाटील 5, प्रांजल पाटील 5) वि.वि.मॅजिशियन: 0;
अंतिम फेरी:
उस्मानाबाद अ(धाराशिव): 15(प्रतीक्षा माळी 10, अदिती राऊत 5) वि.वि.कोल्हापूर अ: 0;
तिसरे आणि चौथे स्थान:
सातारा अ: 15 (मृदुला मूर्ती 5, आरती खांडेकर 10) वि.वि.मॅजिशियन: 0.
महत्वाच्या बातम्या –
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत भारताच्या माया राजेश्वरन रेवती, फ्रांसच्या मोइस कौमे यांना विजेतेपद
पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर लीगमध्ये पंडित जावडेकर डॉल्फिन्स, लाइफसायल स्नो लेपर्ड्स, स्वोजस टायगर्स संघांची विजयी सलामी