fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सानिया मिर्झाला पाकिस्तानी लोक करताहेत ट्रोल, कारण…

मुंबई । पाकिस्तानमध्ये शुक्रवारी एका विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या विमान दुर्घटनेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. लाहोर ते कराची असा प्रवास करणारे हे विमान कराचीजवळच्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सजवळ लँडिंग होत असताना दुर्घटना घडली.

या घटनेबद्दल भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिने या घटनेला हृदयद्रावक असे म्हणून पोस्ट केल्यानंतर पाकिस्तानी फॅन्सने सानिया मिर्झाला ट्रोल करत भारतीय लोक या घटनेबद्दल खिल्ली उडवत असल्याची प्रतिक्रिया दिली.

शोएब मलिक या दुर्घटनेने शोएब मलिकने देखील या दुर्घटनेनंतर एक ट्विट करत म्हणाला की, कोरोनासारख्या खतरनाक महामारी नंतर आता आणखी एक संकट आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी मी प्रार्थना करतो. अल्ला सर्वत्र शांती राहू दे. शोएब मलिकचे हे ट्विट सानिया मिर्झाने शेअर करत लिहिले की, मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबांतील सदस्यांना या दुःखातून बाहेर पडण्यात बळ मिळो.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दुर्घटना झालेल्या विमानात एकूण 99 लोक प्रवास करत होते, ज्यात 9 लहान मुलांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार , मदतीसाठी पाकिस्तान सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहेत. घटनेनंतर जगभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

You might also like