---Advertisement---

हेल्मेटवर चेंडू लागल्याने विजय शंकर मैदानावरच कोसळला अन् चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला

On: रविवार, ऑक्टोबर 25, 2020 7:39 AM
---Advertisement---

किंग्स इलेव्हन पंजाब संघाने शनिवारी (२४ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १२ धावांनी विजय मिळवला. हा पंजाबचा या हंगामातील पाचवा विजय होता. असे असले तरी या सामन्यादरम्यान काळजाचा ठोका चुकवणारी गोष्ट घडली. हैदराबादचा धडाकेबाज अष्टपैलू विजय शंकरच्या हेल्मेटला चेंडू लागला.

प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने ७ विकेट्स गमावत १२६ धावा केल्या होत्या. पंजाबच्या १२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाची सुरुवातीची फलंदाजी फळी लवकरच गारद झाली. त्यानंतर ९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाजीसाठी विजय शंकर आला. त्याने यावेळी पुढची ८ षटके फलंदाजी करत हैदराबादचा किल्ला लढवला.

परंतु झाले असे की, १८ व्या षटकातील चौथा चेंडू अर्शदीप सिंगने हैदराबादचा फलंदाज जेसन होल्डरला टाकला. त्यावर होल्डर एक धाव घेण्यासाठी धावला. नॉन स्ट्रायकर एन्डला असणारा शंकरही वरच्या एन्डला धावला. यादरम्यान क्षेत्ररक्षक निकोलस पूरनने स्टम्पला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चेंडू स्टम्पवर न लागता थेट शंकरच्या हेल्मेटला जाऊन लागला.

हा चेंडू इतका वेगात होता की, त्यामुळे शंकर गडबडला आणि जमिनीवर कोसळला. यावेळी त्याच्याजवळ पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि फिजिओ आले. परंतु त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. त्यानंतर शंकरने पूरनच्या हातात हात दिला आणि पुन्हा फलंदाजासाठी तयार झाला.

https://twitter.com/Sev_Khamani/status/1320059370915332097

https://twitter.com/1998Srikrishna/status/1320059321682546688

https://twitter.com/Jebaraj59/status/1320059817558409220

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर शंकर झेलबाद झाला. त्यापुढे फलंदाजीसाठी येणारे हैदराबादचे फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतले. अशाप्रकारे १ षटक आणि १२ धावांनी पंजाबने हा सामना आपल्या खिशात घातला.

यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी शंकरसाठी हळहळ व्यक्त केली. आणि तो बरा असावा अशी आशाही व्यक्त केली. यासोबतच मैदानावर असताना फलंदाजांना हेल्मेट घालणे बंधनकारक करा अशी मागणीही केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-छा गये पांडेजी ! राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर ट्विटरवर मनीष पांडेच्याच नावाचा कल्ला

-“आर्चरने तिसरे षटक फेकले असते तर…”, राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर मनीष पांडेची प्रतिक्रिया

-ट्विटर वॉर!! धुव्वांदार विजयानंतर हैदराबादने राजस्थानला डिवचलं, ‘असा’ घेतला बिर्यानीचा बदला

ट्रेंडिंग लेख-

-‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’

-“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला

-तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---