जगातील सर्वात लोकप्रिय टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) पंधरावा हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. २६ मार्चपासून मुंबई आणि पुणे येथे ४ मैदानांवर ही स्पर्धा खेळली जाईल. तत्पूर्वी, सर्व संघांनी या हंगामाची तयारी सुरू केली आहे.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात विजेतेपद मिळविल्यानंतर त्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी तयारीत असलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघानेदेखील काही देशांतर्गत खेळाडूंसह पहिला प्रॅक्टिस कॅम्प नागपूर येथे संपन्न झाला. यानंतर संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने संघ विजेतेपद मिळविण्यासाठी तयार असल्याचे म्हटले.
काय म्हणाला जयस्वाल?
आयपीएल २०२२ साठी राजस्थान रॉयल्सने कर्णधार संजू सॅमसन, जोस बटलर यांच्यासह यशस्वी जयस्वाल याला रिटेन केले होते. नुकताच कानपूर येथे संघाचा पहिला कॅम्प लावला गेला होता. या कॅम्पमध्ये यशस्वी जयस्वाल, रियान पराग व केसी करीअप्पा हे ओळखीचे चेहरे दिसून आले. या व्यतिरिक्त नव्याने संघाशी जोडले गेलेले अनुनय सिंग, शुभम गढवाल, कुलदीप सेन व कुलदीप यादव हे खेळाडू या कॅम्प मध्ये सहभागी झालेले. संघाच्या मुख्य खेळाडूंपैकी एक असलेल्या जयस्वालने म्हटले की,
“आम्ही लिलावात एक असा संघ बांधण्यात यशस्वी ठरलो आहोत, जो संघ विजेतेपद मिळवू शकतो.”
स्वतःच्या तयारीबाबत बोलताना तो म्हणाला,
“तुम्ही मैदानाबाहेर कशाप्रकारे तयारी करता यावरही बरेच काही अवलंबून असते. मी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. फलंदाजी कौशल्य आणि फिटनेसवरही बरेच लक्ष दिले आहे. यावेळी माझी कामगिरी आणखी चांगली होईल अशी मी आशा व्यक्त करतो.”
जयस्वाल यापूर्वी खेळलेल्या दोन्ही हंगामात राजस्थान संघाचा आज भाग राहिला होता. त्याने आत्तापर्यंत १३ सामने खेळताना २२.२३ च्या सरासरीने २८९ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स नव्या हंगामात २९ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधी दिसला हार्दिक पांड्याचा नवा अवतार, बनला ‘बॉम्ब एक्सपर्ट’ (mahasports.in)