कोलंबो । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला दुसरा झटका बसला आहे. दिलशान मुनावीरा भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीकडे झेल देऊन माघारी परतला आहे. त्याने ५ चेंडूत ४ धावा केल्या.
तत्पूर्वी पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने तिसऱ्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर निरोशन डिकवेल्लाला स्वतःकडे झेल द्यायला भाग पडले.
आज श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत श्रीलंका संघाने केवळ दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आहे.
भारताने या मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना सोडून भारतीय संघाने सर्व सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्या दोन सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतला होता तर चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
सद्यस्थितीत श्रीलंकेच्या ७. १ षटकात २ बाद ४२ धावा असून कर्णधार उपुल थरांगा ३० वर लाहिरू थिरीमाने १ धावेवर खेळत आहे.