पाचगणी ।रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत देशभरांतून 150हुन अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.
ही स्पर्धा पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे दि.14 ते 20 एप्रिल 2018 या कालावधीत रंगणार आहे.
रवाईन हॉटेल यांच्या तर्फे गेली 10 वर्षे अनेक भव्य टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धादेखील याचाच एक भाग आहे. पाचगणी येथील सुंदर व्हॅलीच्या ठिकाणी असलेल्या रवाईन हॉटेलच्या टेनिस कोर्टवर ही स्पर्धा होत आहे.हि स्पर्धा 16 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटांत होणार आहे.