उद्या(3 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंगटन येथे पार पडणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला एक विक्रम करण्याची संधी आहे.
बोल्टने जर या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला बाद केले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितला सर्वाधिक वेळा बाद करणारा दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज ठरेल. त्याचबरोबर तो या यादीत टिम साऊथी, मॉर्ने मॉर्केल, कागिसो रबाडा या वेगवान गोलंदाजांना मागे टाकेल.
सध्या रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बोल्टसह साऊथी, मॉर्केल आणि रबाडा यांनी प्रत्येकी सात वेळा बाद केले आहे. तसेच अँजेलो मॅथ्यूज हा रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याने रोहितला 10 वेळा बाद केले आहे.
सध्या न्यूझीलंड विरुद्ध चालू असलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहितला बाद करण्यात बोल्टला एकदाच यश आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारे वेगवान गोलंदाज-
10 – अँजेलो मॅथ्यूज
7 – ट्रेंट बोल्ट
7 – टिम साऊथी
7 – मॉर्ने मॉर्केल
7 – कागिसो रबाडा
5 – मुस्तफिझुर रेहमान
महत्त्वाच्या बातम्या-
–न्यूझीलंडचा द्विशतकवीर पाचव्या वन-डेला मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
–सांगली एक्सप्रेस स्म्रीती मंधनाने जागतिक क्रमवारीतही घेतली मोठी झेप
–एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे मोठी खुशखबर