---Advertisement---

मुंबईचं टेन्शन वाढलं! आर्चर तब्बल 678 दिवसांनी उतरला मैदानात, पण नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद

On: रविवार, जानेवारी 29, 2023 12:02 PM
Jofra-Archer
---Advertisement---

जगभरात अनेक दमदार वेगवान गोलंदाज आहेत. यामध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या नावाचाही समावेश होतो. आर्चर मागील काही काळापासून दुखापतींमुळे क्रिकेटपासून दूर होता. मात्र, त्याने तब्बल 678 दिवसांच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तो इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाच्या वनडे मालिकेत पहिला सामना खेळण्यासाठी उतरला. मात्र, त्याला या सामन्यात खास जादू दाखवता आली नाही. त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.

शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) संघात पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडला 27 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी जोरदार धुलाई केली. या सामन्यात त्याने वनडे कारकीर्दीतील सर्वात महागडी गोलंदाजी केली. त्यामुळे आर्चरने लाजीरवाणा विक्रम नावावर केला.

आर्चरचा लाजीरवाणा विक्रम
आर्चरने मार्च, 2021नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. मात्र, त्याचे हे पुनरागमन यादगार ठरले नाही. आर्चरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटके गोलंदाजी केली. यावेळी त्याने तब्बल 81 धावा खर्च केल्या आणि फक्त 1 विकेट नावावर केली. ही त्याच्या वनडे कारकीर्दीतील सर्वात खराब गोलंदाजी आहे. आर्चरच्या या गोलंदाजीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचीही चिंता वाढवली आहे. 27 वर्षीय आर्चर आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळतो.

सामन्याचा आढावा
शुक्रवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडपुढे 299 धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळी इंग्लंडकडून आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) याने शानदार शतक (91 चेंडू 113 धावा) झळकावले. मात्र, तरीही इंग्लंड संघाला 44.2 षटकातच सर्व विकेट्स गमावत 271 धावाच करता आल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना 27 धावांनी खिशात घातला. या विजयासह दक्षिण आफ्रिका मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सिसंडा मगाला याने 3 विकेट्स घेत सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले.

उभय संघातील दुसरा वनडे सामना रविवारी (दि. 29 जानेवारी) ब्लोमफोंटेन येथे खेळला जाणार आहे. (pacer jofra archer make shameful record in 1st odi match against south africa)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! मिताली पुन्हा ठेवणार मैदानावर पाऊल, महिला आयपीएलमध्ये मिळाली ‘या’ संघाची मोठी जबाबदारी
IND vs NZ 2nd T20: भारत-न्यूझीलंडमध्ये कोण कुणावर भारी? वाचा आमने-सामने रेकॉर्ड काय सांगतो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---