भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीची धुरा सांभाळणाऱ्या जबरदस्त खेळाडूंमध्ये मोहम्मद शमी याच्या नावाचा समावेश होतो. शमीने संघाला गरज पडेल, तेव्हा आपल्या भेदक गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांना धडकी भरवत त्यांच्या विकेट्स घेतल्या आहेत. अशातच ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारपासून (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे सुरुवात झाली. यादरम्यान पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच शमीने विकेट काढली. विशेष म्हणजे, त्याने भेदक गोलंदाजीने त्रिफळा उडवला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पहिल्या कसोटीत मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने डेविड वॉर्नर (David Warner) याचा त्रिफळा उडवला. या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि डेविड वॉर्नर सलामीला आले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाची सुरुवात मोहम्मद सिराज याने बिघडवली. त्याने डावाच्या दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर ख्वाजाची (1 धाव) विकेट घेतली.
शमीने अशी घेतली विकेट
या डावाच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसला. अनुभवी फलंदाज वॉर्नर याला शमीने तंबूत धाडले. विशेष म्हणजे, वॉर्नरलादेखील फक्त 1 धावेवर समाधान मानावे लागले. शमीने पहिलाच चेंडू एकदम गुड लेंथवर टाकला, जो रोखण्यासाठी वॉर्नर थोडासा पुढे आला. मात्र, चेंडू आतल्या बाजूने आला आणि स्टंप्सला जाऊन लागला. हे पाहून वॉर्नरही हैराण झाला. त्याला समजलेच नाही की, बॅट आणि पॅडमध्ये कुठे चूक झाली की, चेंडू आतमध्ये येऊन स्टंपला जाऊन लागला. यावेळी शमीच्या वेगवान चेंडूमुळे स्टंप हवेत उडाला. यानंतर शमीने एकच जल्लोष केला.
What a ball, Shami. pic.twitter.com/nts6lBiDJU
— Johns. (@CricCrazyJohns) February 9, 2023
What a delivery by Mohammad Shami – absolute peach. pic.twitter.com/BSdRwqPMJv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 9, 2023
ऑस्ट्रेलिया 2 धावेवर 2 विकेट्स
जेव्हा ख्वाजापाठोपाठ वॉर्नर बाद झाला, तेव्हा 2 धावांवर 2 विकेट्स ही ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या होती. इथून पुढे मार्नस लॅब्यूशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची खेळी केली. त्यात स्मिथच्या 25, तर लॅब्यूशेनच्या 49 धावांचा समावेश होता. लॅब्यूशेन 49 धावांवर खेळत असताना रवींद्र जडेजा याने यष्टीरक्षक एस भरत याच्या हातून वॉर्नरला यष्टीचीत बाद केले. (mohammed shami sends david warner off stump cartwheeling with a magnificient delivery see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात काँटे की टक्कर, दुसरीकडे धोनी ट्रॅक्टरने नांगरतोय शेती, व्हिडिओ तुफान व्हायरल
भारत vs ऑस्ट्रेलिया कसोटी।भारतीय तोफखान्याचा ऑस्ट्रेलियाला दणका! दोन्ही सलामीवीर 10 मिनिटात तंबूत