भारतीय क्रिकेट संघाचे माजी मानसिक स्वास्थ्य प्रशिक्षक पॅडी ऑप्टन त्यांनी नुकतेच एक खळबळजनक विधान केले आहे. ऑप्टन यांच्यामते जर खेळाडूंनी बराच काळ बायो बबलमध्ये राहून क्रिकेट सामने खेळले; तर त्यांना मानसिक स्वास्थ्याचे आजार जडू शकतात. मागील वर्षभरापासून कोरोनामुळे जगभरातील सर्वच खेळाडूंना बायो बबलमध्ये राहून क्रिकेट खेळावे लागत आहे. त्यामुळे ऑप्टन यांनी चिंता व्यक्त केली आहे.
ऑप्टन म्हणाले, “खेळाडूंसाठी बायो बबल तयार करण्यात आले आहेत. मात्र आयसीसी किंवा इतर खेळांच्या संघटनांनी याचा खेळाडूंवर काय प्रभाव पडतो? याची कुठलीही शहानिशा केलेली नाही. आपण अजूनपर्यंत बायो बबलचे वाईट परिणाम बघितलेले नाहीत. पण येणाऱ्या काळात खेळाडूंना मानसिक स्वास्थ्याच्या समस्या जाणवू शकतात.”
ऑप्टन यांच्यामते या समस्येवर समाधान शोधले जाऊ शकते. मात्र अजून कुठलीही प्रगती झालेली नाही. ऑप्टन म्हणाले, “बायोबबल संदर्भात कुठलेतरी समाधान नक्कीच शोधले जाऊ शकते. मात्र अजून तरी कुठलाही निर्णय झालेला नाही.”
भारतीय संघाचा विचार केला असता सर्वच खेळाडू जवळ-जवळ मागील ७ महिन्यांपासून बायोबबलमध्ये आहेत. मागीलवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान आयपीएल व त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला सक्तीने बायो बबलमध्ये राहणे गरजेचे होते. आगामी काळात इंग्लंड विरुद्ध मायदेशात मालिका होणार असून तिथे देखील नियमांचे काटेकोरपने पालन करावे लागणार आहे. असे असले तरी, यावेळी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना आपल्या कुटुबीयांसोबत क्वारंटाइनमध्ये राहण्याची परवानगी दिली आहे.
इंग्लंड संघ पोहोचला चेन्नईत
काही दिवसांपुर्वीच श्रीलंका दौरा आटोपून पाहुण्या इंग्लंड संघाचे भारतात आगमन झाले आहे. तसेच भारतीय संघाचे खेळाडूही चेन्नईत पोहोचले आहेत. या दोन्ही संघांना चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सहा दिवसांच्या विलगीकरण कालावधीनंतर हे दोन्ही संघ सरावास सुरुवात करतील.
लवकरच भिडणार भारत-इंग्लंड संघ
इंग्लंडच्या भारत दौऱ्यात दोन्ही संघात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. यजमान भारत आणि पाहुणा इंग्लंड संघ विजयरथावर स्वार असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ च्या फराकाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने श्रीलंकाला २-० ने क्लिन स्विप केले आहे. अशात ही कसोटी मालिका अतिशय अतीतटीची होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली रणजी ट्रॉफी स्पर्धा, ‘हे’ आहे कारण
एक अविस्मणीय क्रिकेट सामना! ४५ धावांवर बाद होऊनही इंग्लंडने मिळवला होता शानदार कसोटी विजय