---Advertisement---

वेड क्रिकेटचे! रिकाम्या वेळेत बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना लुटतोय क्रिकेटचा आनंद, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

On: शनिवार, जानेवारी 30, 2021 11:05 AM
---Advertisement---

क्रिकेट हा सर्वांचा आवडता खेळ असतो. लहान मुलांपासून ते मोठमोठ्या व्यक्ती रिकामा वेळ मिळाला की क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देतात. बॉलिवूड स्टार्सदेखील बऱ्याचदा क्रिकेटचा आनंद लुटताना दिसतात. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याला अभिनयाव्यतिरिक्त गाणे गायला आवडते, हे आपणा सर्वांना माहिती आहे. याव्यतिरिक्त त्याला क्रिकेटचीही खूप आवड आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर आपला क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आपल्या अधिकृत इंस्ट्राग्रामवर आयुष्मानने क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओमध्ये, तो अतिशय नयनरम्य ठिकाणी क्रिकेट खेळताना दिसत आहे. दोन खुर्च्या ठेवून त्याने क्रिकेटची खेळपट्टी तयार केली आहे. दरम्यान फलंदाजी करताना त्याने हवेत जबरदस्त षटकार मारला. सोबतच आयुष्मानला चियर करण्यासाठी आलेले चिमुकले या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘In between shots! #NorthEast’.

https://www.instagram.com/p/CKk2d4xBkmi/?utm_source=ig_web_button_share_sheet

आयुष्मानच्या या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली आहे. अनेकांनी त्याच्या शानदार षटकाराची प्रशंसा केली आहे. नुकतीच त्याने आपला नवा चित्रपट ‘चंडीगढ करे अशिकी’ची शूटींग पूर्ण केली आहे. सध्या तो नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आसामला गेला आहे. यादरम्यान रिकामा वेळ मिळाल्यानंतर त्याने क्रिकेटचा डाव मांडला होता.

आयुष्मान खुराना याने २०१२ मध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात आयुष्मानव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही मुख्य भूमिकेत होती. यानंतर त्याने दम लगा के हैशा, बरेली की बर्फी, बाला, ड्रीम गर्ल, बधाई हो, अंधाधुंद आणि आर्टिकल १५ असे हिट हिंदी चित्रपट दिले.

महत्त्वाच्या बातम्या-

क्वारंटीम..! रोहित शर्माने पत्नीसोबतचा फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, पाहा फोटो

…म्हणून गौतम गंभीरचा विरोध करत आहेत दिग्गज भारतीय तिरंदाज; पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लिहले पत्र

आयपीएलचा ‘मिलियन डॉलर बेबी’ ग्लेन मॅक्सवेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---