---Advertisement---

क्वारंटीम..! रोहित शर्माने पत्नीसोबतचा फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, पाहा फोटो

On: शनिवार, जानेवारी 30, 2021 10:20 AM
---Advertisement---

कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडाविश्वावर अनेक बंधने लादली गेली आहेत. क्रिकेटदेखील यापासून निराळे राहिले नाही. सर्व प्रमुख स्पर्धा आणि मालिकांवेळी संघांना जैव प्रतिबंधक वातावरणात म्हणजेच बायो-बबलमध्ये राहणे अनिवार्य झाले आहे. मात्र कोरोनामुळे मागील ६-७ महिन्यांपासून भारतीय खेळाडू कुटुंबीयांना सोडून राहत आहेत. त्यामुळे सध्या बीसीसीआयने खेळाडूंना कुटुंबीयांसोबत चेन्नईला जाण्याची परवानगी दिली आहे. यानंतर भारताचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा आपली पत्नी रितीका सजदेहसोबत क्वारंटाइनचा आनंद लुटत असल्याचे दिसत आहे.

रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीमध्ये दोघांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये रोहित आणि रितीका हॉटेलच्या खोलीच्या बालकनीमध्ये बसल्याचे दिसत आहे. त्यांच्या बाल्कनीसमोर दूरवर समुद्राचा सुंदर नजारा दिसत आहे. या फोटोवर रोहितने मोठ्या अक्षरात ‘क्वारंटीम’ असे लिहिले आहे.

Screengrab: Instagram/Rohit Sharma

रोहितसह इतर भारतीय खेळाडू पोहोचले कुटुंबीयांसोबत 

भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्याआधी गुरुवारी (२८ जानेवारी) भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीदरम्यान सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आढळला आहे. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंना कुटुंबीयांसोबत चेन्नईला जाण्याची परवानगी दिली आहे.

रोहितव्यतिरिक्त भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, यष्टिरक्षक वृद्धिमान साहा, अष्टपैलू हार्दिक पांड्या हे सर्व आपापल्या कुटुंबीयांसोबत चेन्नईत दाखल झाले आहेत. तिथे त्यांना चेन्नईच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये विलगीकरणात (क्वारंटाइन) ठेवण्यात आले आहे.

भारतीय खेळाडू ६ दिवस विलगीकरणात राहणार आहेत. यादरम्यान त्यांच्या अजून २ कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. २ फेब्रुवारीपासून भारतीय खेळाडू सरावास सुरुवात करणार आहेत. या दोन्ही चाचण्या उत्तीर्ण करणाऱ्या खेळाडूंनाच सराव करण्याची संधी दिली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

एक अविस्मणीय क्रिकेट सामना! ४५ धावांवर बाद होऊनही इंग्लंडने मिळवला होता शानदार कसोटी विजय

लुईसची मैदानावर चौफेर फटकेबाजी, एकाच षटकात ठोकले तब्बल ५ षटकार

सात वर्षांपासून आयपीएलमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या ‘त्या’ खेळाडूची तमिळनाडूकडून धुव्वादार बॅटिंग, गाठलं फायनल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---