पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 18वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात आर्यन भुजबळ, रोनित मुथा, रोहन नागर, प्रथमेश पाटील, साईराज साळुंखे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
एमएसएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे बालेवाडी या ठिकाणी आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात आर्यन भुजबळने पारस घाडगेचा 9-3 असा तर, रोनित मुथाने स्वराज देशमुखचा 9-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली. रोहन नागरने ओम राऊतला 9-1 असे पराभूत केले. साईराज साळुंखे व ओमकार शिंदे यांनी अनुक्रमे देव तुराकिया व आर्यन हूड यांचा 9-3 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. मिहिर कांतावालाने अभिनव महामुनीचा 9-0 असा एकतर्फी पराभव केला.
मुलींच्या गटात साईशा कारेकर हिने मनश्री वाकोडेचा 9-0 असा तर, भक्ती ताजनेने तन्वी देवकरचा 9-1 असा पराभव करून दुसऱ्या पात्रता फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
आर्यन भुजबळ वि.वि.पारस घाडगे 9-3;
मिहिर कांतावाला वि.वि.अभिनव महामुनी 9-0;
रोनित मुथा वि.वि.स्वराज देशमुख 9-2;
रोहन नागर वि.वि.ओम राऊत 9-1;
ऋषिकेश अय्यर वि.वि.क्षितीज नाहर 9-0;
श्रेयस प्रसाद वि.वि.सक्षम चव्हाण 9-0;
शिवम पाडिया वि.वि.अनुश घनबहादूर 9-6;
प्रथमेश पाटील वि.वि.निमय महाडिक 9-6;
क्रिश मर्चंट वि.वि.शमीम मोहम्मद 9-4;
साईराज साळुंखे वि.वि.देव तुराकिया 9-3;
ओमकार शिंदे वि.वि.आर्यन हूड 9-3;
मुली:
साईशा कारेकर वि.वि.मनश्री वाकोडे 9-0;
भक्ती ताजने वि.वि.तन्वी देवकर 9-1.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्याही संयमाचा बांध, भलताच झालेला ‘अँग्री यंग मॅन’
कर्णधार रिषभ पंतची बॅट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओकणार आग! पूर्ण करणार षटकारांचे ‘हे’ खास शतक
अँडरसनच्या आधी बोल्टने केली मुरलीधरनच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी