आशिया चषक २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी सर्व संघ युएईला पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तान संघांनी युएईत सरावालाही सुरुवात केली आहे. यादरम्यान पाकिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील महामुकाबल्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. युएईतील सराव सत्रानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पाकिस्तानचा संघ पूर्ण मेहनत असल्याचे सांगितले. तसेच पाकिस्तान संघ फक्त भारताविरुद्धच्या सामन्याचा नव्हे तर संपूर्ण आशिया चषकाबद्दल विचार करत असल्याचे सांगितले आहे.
पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार राहिलेले युसूफ (Mohammad Yousuf) सराव सत्रानंतर म्हणाले की, “आज संपूर्ण संघाने व्यवस्थित सराव केला. येथे खूप जास्त गरमी आहे. परंतु आम्ही प्रोफेशनल आहोत आणि गरमीतही खेळणे आम्हाला माहिती आहे.”
भारताविरुद्धच्या सामन्याबद्दल (India vs Pakistan) बोलताना ते म्हणाले की, “आमच्या डोक्यात पहिला विचार आशिया चषक जिंकणे हा आहे. आम्ही फक्त भारताविरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करत नाही आहोत. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ आशिया चषक जिंकण्यावर ध्यान देत आहे. आमच्या मनात पहिला विचार ही स्पर्धा जिंकण्याचा आहे. कारण विश्वचषकापूर्वी ही स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल.”
आशिया चषकात (Asia Cup 2022) भारत आणि पाकिस्तान संघ अ गटात आहेत. उभय संघातील पहिला सामना २८ ऑगस्टला दुबईत होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ जवळपास १० महिन्यांपूर्वीचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील असेल. टी२० विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाची परतफेड करण्याची हीच भारताकडे चांगली संधी असणार आहे.
आशिया चषक २०२२साठी पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर ., नसीम शाह, शाहनवाज धानी, उस्मान कादिर आणि मोहम्मद हसनैन.
आशिया चषक २०२२ साठी भारत संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी जगातील सर्वात महान फिरकीपटू’, ख्रिस गेलने खास शैलीत केले स्वत:चे कौतुक
‘उमरान मलिकला संधी द्यायला हवी होती!’ पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने चोळले जखमेवर मीठ
भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकायचा असेल तर ‘ही’ गोष्ट आवर्जून करावी लागेल, माजी दिग्गजाने सांगितलंय