क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावरील वातावरण अनेकदा मजेशीर, तर कधी-कधी तापल्याचे असते. संघसहकाऱ्याच्या चुकीमुळे एखादा खेळाडू बाद झाला, तर त्याचा राग आपल्याला पाहायला मिळतो. असेच काहीसे पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील एका सामन्यात पाहायला मिळाले. पाकिस्तानचा फलंदाज इमाम-उल-हक हा धावबाद झाल्यामुळे रागात दिसतो. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुल्तानमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानी फलंदाज फखर झमान (Fakhar Zaman) लवकर बाद झाल्यामुळे कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि इमाम-उल-हक (Imam-ul-Haq) यांनी १२० धावांची भागीदारी रचली. मात्र, ७२ धावांवर खेळत असताना इमामला तंबूत जावे लागले. २८व्या षटकादरम्यान बाबर अर्धशतकाजवळ पोहोचल्यानंतर इमामने अकील होसेन याच्या चेंडूला मिडविकेटवरून एक शॉट मारला. तसेच, एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाबरचे लक्ष चेंडूवर होते आणि त्याला धाव घेण्यात कोणताही रस नव्हता. त्याने आपला सहकारी इमामला परत पाठवण्याचा प्रयत्न केला.
या व्हिडिओत स्पष्ट दिसते की, २८व्या षटकात इमाम धावत दुसऱ्या बाजूला पोहोचतो. मात्र, बाबर आपली जागा सोडत नाही. हे पाहून इमाम पुन्हा आपल्या जागेवर जाण्याच्या प्रयत्नात धावबाद होतो. बाद झाल्यानंतर तो बॅट आपटत आपला राग व्यक्त करतो. तसेच, ओरडत पव्हेलियनच्या दिशेने जातो.
https://www.instagram.com/p/CeoFinAtPYN/?utm_source=ig_embed&ig_rid=019995e7-c886-476d-952f-1e7187fd91f9
या चेंडूच्या आधी बाबरने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. यानंतर बाबरने आपल्या खेळीत ७७ धावा चोपल्या. दुसऱ्या सामन्यात बाबर आणि इमाम हे दोघेही शानदार फॉर्ममध्ये होते. मात्र, बाबरला कुमार संगकाराचा सलग ४ शतके ठोकण्याचा विक्रम मोडण्यात अपयश आले.
पहिल्या सामन्यात बाबरने १०३ धावांची खेळी केली होती. त्यामुळे पाकिस्तानला ३०९ धावांचा डोंगर उभा करता आला होता. बाबरने वनडेत सलग ३ शतके ठोकण्याची ही त्याची दुसरी वेळ होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकत रोहित- विराटचा विक्रम मोडायला निघालेला बाबर आझम, अर्धशतकावरच मानावं लागलं समाधान
‘पहिला सामना हारूनही पंत खुश असेल’, दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराचे गजब वक्तव्य
‘भावा आयपीएल संपलीये’, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पंड्याने घेतली मिलरची फिरकी